सावंगी (मेघे) परिसरात अवैध गौणखनिज उत्खनन

    दिनांक :29-May-2026
Total Views |
 वर्धा, 
Illegal Minor Mineral Mining सावंगी (मेघे) पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासुन राजरोसपणे अवैध गौणखनिज उत्खनन सुरू असल्याने शासनाचा मोठा महसूल बुडत आहे. दिवसरात्र माती, मुरूमाचे अवैध उत्खनन सुरू असतानाही पोलिस आणि महसूल विभाग कारवाई करीत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यत करण्यात येत आहे. बुरांडेला नेमका कोणाचा आशीर्वाद असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
 
 
murum
 (संग्रहित छायाचित्र)
 
 
सावंगी (मेघे) परिसरातील पालोती, सालोड (हिरापूर) येथे वनविभाग आणि शासकीय जमीन आहे. तसेच छोट्या टेकड्यासुद्धा आहेत. आता तर थेट जेसीबीच्या सहाय्यानेच या टेकट्या पोखरल्या जात असून दररोज हजारो टन गौण खनिजाची चोरी होत आहे. वन विभागाच्या जमिनीही पोखरली जात असल्याने ठिकठिकाणी खोल खड्डे पडले आहेत. पालोती मार्गानेसुद्धा गौणखनिजाची
ओव्हरलोड वाहतूक सुरू असते. सावंगी परिसरात मोठ्या प्रमाणात नवीन घरांचे बांधकाम सुरू आहे. यामुळे मुरुमाची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने दिवसरात्र अवैध गौणखनिजाची उत्खनन सुरू आहे.
 
 
Illegal Minor Mineral Mining  या ओव्हरलोड वाहतुकीमुळे परिसरातील अंतर्गत रस्त्यांचीसुद्धा चाळणी झाली आहे. अवैध गौण खनिज उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. गौण खनिज उत्खनन करणार्‍यांविषयी पोलिस प्रशासनासह व महसूल विभाग चुप्पी का साधून आहेत असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. महसूल विभागाने गौणखजिन उत्खनन करणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.