इंधन दरवाढी विरोधात महाविकास आघाडीचा आक्रोश

    दिनांक :29-May-2026
Total Views |
जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन
 
वाशीम, 
मागील काही दिवसात Increase in petrol and diesel prices पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे व महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त झालेली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल ची दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू चौधरी यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी केली असून, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन जिल्हाधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन दिले.
 
 
dar
 
मागील काही वर्षात पेट्रोलच्या किमतीत ३८ टयांनी तर डिझेलच्या किमतीत ६२ टयांनी वाढ झाली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग च्या नेतृत्वाखाली त्यांच्या यूपीए सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्स प्रति बॅरल पर्यंत पोहोचले असतानाही पेट्रोल डिझेलच्या किमती ७२ रुपये प्रति लिटर होत्या. पण मागील काही वर्षात कच्च्या तेलाचे भाव ५० ते ५५ डॉलर्स प्रति बॅरल असतांनाही पेट्रोल व डिझेलचे भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनावरील कर आणि उत्पादन शुल्काच्या माध्यमातून जनतेच्या खिशातून ४३ लाख कोटी रुपयांचा नफा कमविला आहे.
 
 
Increase in petrol and diesel prices  पेट्रोल डिझेल व गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्याने त्याचा मोठा परिणाम सामान्य जनतेवर होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. शेतीची कामे करण्यासाठी ट्रॅटरचा वापर केला जातो, त्यासाठी डिझेलची आवश्यकता आहे. राज्यातील अनेक पेट्रोल पंप बंद आहेत त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. शेतीची कामे वेळेत झाली नाही तर अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम होईल व पुन्हा महागाई वाढेल, असेही निवेदनात नमूद केले आहे.
 
 
यावेळी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष राजू चौधरी, दिलीपराव सरनाईक, शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष बालाजी वानखेडे, राकॉ शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबाराव पाटील खडसे, माजी जिप सदस्य दिलीप देशमुख, काँग्रेस तालुकाध्यक्ष महादेव सोळंके, मनसे जिल्हाध्यक्ष राजू किडसे, राजू वानखेडे, कॅ. प्रशांत सुर्य,आम आदमी पार्टीचे अध्यक्ष राम डोरले पाटील, राजु घोडीवाले, यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.