पत्नीनेच पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

    दिनांक :29-May-2026
Total Views |
पत्नीसह दोन आरोपींना अटक

आर्णी, 
Instigated suicide तालुक्यातील लोणी गावातील सुनील वासुदेव खाडे याने आपल्या घरात आत्महत्या केली. त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, अशी तक्रार मृतकाच्या भावाने आर्णी पोलिस ठाण्यात दिल्यावर पोलिसांनी मृतकाची पत्नी व गावातील रोहिदास राठोड या दोघांना अटक केली. पोलिस सूत्रांनुसार, सुनील खाडे हा गावातीलच रोहिदास राठोड याच्या ट्रॅक्टरवर काम करायचा. या दरम्यान रोहिदास राठोड हा सुनीलच्या घरी त्याचा डबा किंवा सामान आणण्यासाठी जात असायचा. अशातच रोहिदास व सुनीलची पत्नी वैशाली यांच्यात ओळख झाली.
 
 
karawas
 
रोहिदास व वैशाली हे दोघे 2 मे रोजी लोणी येथून बाहेरगावी गेले आणि 19 मे रोजी परत आले. त्यात वैशाली सुनील खाडे ही सुनीलच्या घरी न जाता रोहिदास राठोडच्याच घरी रहात होती. मंगळवार, 26 मे रोजी सुनील आपल्या 12 वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन रोहिदासच्या घरी पत्नी वैशालीला समजावण्यासाठी गेला. तेथे सुनीलला त्याच्या मुलासमोर रोहिदास व वैशालीने मारहाण केली. रोहिदासने त्याला बजावले की आता माझ्या घरी यायचे नाही. सुनील मुलाला घेेऊन घरी परतला. तेथे त्याला भाऊ अनिल खाडे भेटला. त्याला सुनीलने सांगितले की, ‘गावात माझी बदनामी झाली, मला माझ्या मुलासमोर रोहिदास व वैशालीने मारहाण केली. आता जगण्यात अर्थ नाही.’
 
 
Instigated suicide  काही वेळानंतरच सुनीलने घरातच गळफास लावून घेतला. यानंतर अनिल खाडेने, ‘रोहिदास राठोड व वैशाली खाडे ह्यांनी माझ्या भावाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून त्याने आत्महत्या केली’, अशी तक्रार दिल्यावर आर्णी पोलिसांनी रोहिदास राठोड (वय 40) व वैशाली सुनील खाडे (35) यांना अटक केली. ही तपास कारवाई ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात रवींद्र जाधव, सतीश चौधर, राम ढाकणे व विशाल जाधव यांनी केली. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.