मनीष डांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
वाशीम,
MNS Road-Block Protest शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी तसेच दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवार, २९ मे रोजी सकाळी ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष मनीष भास्कर डांगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. या आंदोलनामध्ये शेतकरी व दिव्यांगांच्या विविध मागण्यांचा समावेश करण्यात आला होता.
शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये मानधन मंजूर करण्यात यावे, तसेच सक्षम वैद्यकीय मंडळाने प्रमाणित केलेल्या दिव्यांगत्व प्रमाणपत्रधारक लाभार्थ्यांना सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना संजय गांधी योजना व इतर शासकीय योजनांचा लाभ मुदत संपेपर्यंत सुरू ठेवावा, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील दारिद्रययरेषेच्या प्रमाणपत्राची अट रद्द करावी, तसेच दिव्यांगांना रोजगारासाठी शासन निर्णयानुसार २०० चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या. याशिवाय शासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांग नागरिकांना निवेदन अथवा अर्ज सादर करताना तळमजल्यावर आसन व्यवस्था व मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच सध्या बंद असलेले दिव्यांग सहायता पोर्टल तात्काळ सुरू करून दिव्यांग नोंदणी प्रक्रिया पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
MNS Road-Block Protest आंदोलनानंतर जिल्हाधिकारी तसेच दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.या आंदोलनात माजी शहराध्यक्ष रवी वानखडे, गणेश इंगोले, अशोक इंगळे, फकीरा कर्डिले, गणेश खुणारे, मनविसे सरचिटणीस अमोल गाभणे, महेश देशपांडे, शाहरुख मांजरे, जुम्मा बेनीवाले, शुभम घोडे, हनुमान घोडे, धनीराम बाजड, लक्ष्मण वानखडे, संजय सरनाईक, रमेश चव्हाण, गुलाब मनोहर, सतीश कोकणे, शरद देशमुख, संतोष चौधरी, गजानन पांडे, अशोक सरनाईक, योगीराज लाडवेकर, संतोष पडघान, माधव देशमुख, वंदना पडघान, रामराव सरनाईक, गंगाराम खंडारे, अथर्व सरनाईक, सविता सरनाईक, कविता पुंड, लिलाबाई देशमुख, प्रवीण सपाटे, मीना लोटे, मंजुळा पुंड, कडूबा गुडदे, चंद्रभागा पांढरे, नथू पांढरे आदी महाराष्ट्र सैनिक व कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी आणि दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.