नागपूर,
Mobile Thief आरपीएफ नागपूर रेल्वेच्या सीपीडीएस टीम व सीआयबी यांनी मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरील पीआरएस परिसरात मोबाईल चोरास पकडले. चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे. रेल्वे पोलिस गस्त घालत असताना एका संशयित व्यक्ती गुन्हे प्रतिबंधक पथकाला दिसून आला. सखोल चौकशी केली असता त्याने आपले नाव राकेश गोपीचंद मेश्राम असे सांगितले. त्याच्याकडून अंदाजे १० हजार रुपये किमतीचा रियलमी कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. मोबाईल संदर्भात समाधानकारक माहिती न त्यास पुढील चौकशीसाठी आरपीएफ पोस्ट नागपूर येथे आणण्यात आले.
(संग्रहित छायाचित्र)
Mobile Thief आरपीएफ पोस्ट नागपूर येथे उपनिरीक्षक एम. के. पांडे यांनी जप्त मोबाईल संदर्भात सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान आरोपीने कबूल केले की त्याने प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरील पीआरएस परिसरात झोपलेल्या एका प्रवाशाचा रियलमी मोबाईल फोन चोरी केला होता. आरोपीने चोरीची कबुली दिल्यानंतर नागपूरशी संपर्क साधण्यात आला. तपासात संबंधित मोबाईल चोरीबाबत जीआरपी नागपूर येथे यापूर्वीच गुन्हा नोंद झाल्याचे आढळून आले. त्यानंतर आरोपी राकेश गोपीचंद मेश्राम यास जप्त मोबाईल फोनसह पुढील कारवाई करिता जीआरपी नागपूर यांच्या ताब्यात देण्यात आले.