काळ्या जादूच्या संशयातून हत्या; मृतदेहावर केले भयावह कृत्य

    दिनांक :29-May-2026
Total Views |
सीतापूर,
Murder over Suspicion of Black Magic उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात घडलेल्या एका तांत्रिकाच्या हत्येच्या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संदाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ मे रोजी नदीकाठच्या जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. तपासादरम्यान मृताची ओळख सत्यनारायण यादव उर्फ ‘परदेशी बाबा’ अशी पटली. ते लखनौ जिल्ह्यातील मलिहाबाद परिसरातील रहिवासी होते.
 
Murder over Suspicion of Black Magic
 
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी नागेंद्र नावाच्या युवकाला अटक केली आहे. तो मलिहाबादमधील नवीनगर भागातील रहिवासी असून, त्यानेच हत्या केल्याची कबुली दिली आहे. Murder over Suspicion of Black Magic पोलिसांच्या माहितीनुसार, नागेंद्रची आई गेली अनेक वर्षे परदेशी बाबांकडून उपचार घेत होती. मात्र, बाबांकडे काळी जादू आणि तांत्रिक विद्या असल्याचा संशय आरोपीच्या मनात निर्माण झाला होता. याच कारणावरून काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये वादही झाला होता.
 
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या काही महिन्यांपासून हत्येचा कट रचत होता. घटनेच्या दिवशी त्याने एका महिलेवर उपचार करण्यासाठी बोलावल्याचे सांगून बाबांना आपल्या दुचाकीवरून जंगलात नेले. Murder over Suspicion of Black Magic तिथे त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली.
 
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर आरोपीने मृतदेहाच्या हातापायांमध्ये खिळे ठोकल्याचे समोर आले आहे. तांत्रिकाचा आत्मा परत येऊ नये किंवा त्रास देऊ नये, या अंधविश्वासातून हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी आरोपीकडून हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त केले असून, पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने कपडे आणि इतर वस्तू जाळल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. Murder over Suspicion of Black Magicया विचित्र आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.