तापमान ४५.० अंश
नागपूर,
Nagpur's Navtapa नवतपाच्या पाचव्या दिवशी नागपूरचा पारा ४५.० अंश सेल्सिअस नोंदविले. गुरुवारी ४६.४ अंश सेल्सिअस तापमान होते. हवामान विभागाने दिलेल्या दिवसभर शहर चांगलेच तापल्याने होरपळल्यासारखे झाले होते. येत्या ३ जूनपर्यंत शहरातील हवामान असेच राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यानच्या काळात ऊन-सावल्यांचा खेळ म्हणजेच अंशतः ढगाळ हवामान राहणार आहे. शनिवार, ३० मे रोजी जोरदार वारे आणि गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवस पर्यंत अंशतः ढगाळ वातावरण राहील. या शहराचे कमाल तापमान ४३-४४ अंश आणि किमान तापमान २७ ते २९ अंशाच्या आसपास राहण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे.
Nagpur's Navtapa शुक्रवारी दिवसभर अंगाची लाही करणार्या उन्हामुळे घाम निघाला. गुरुवारच्या तुलणेत तापमान कमी झाले तरी अक्षरशः भाजल्यासारखे झाले होते. तीव्र उष्णतेमुळे सायंकाळनंतर उकाड्याचा त्रास सहण करावा लागत आहे. एकीकडे तापमान वाढले तरी सुध्दा सर्वच बाजारपेठेतील गर्दी मात्र कायम असल्याचे दिसून येते. अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नयेत, असा इशारा दिल्यानंतरही रस्त्यांवरील वर्दळ नेहमीप्रमाणे आहे.