नालवाडी ग्रामपंचायतचा ठराव
वर्धा,
OBC column in the census देशाची जनगणना सुरू असून जनगणना फॉर्ममध्ये प्रश्न क्रमांक १२ मध्ये एससी, एसटी व इतर असे लिहिलेले आहे. परंतु, इतर मागास वर्गीय समाजाचा कुठेही समावेश किंवा उल्लेख नाही त्यामुळे ओबीसी समाजाची टक्केवारी निर्धारित होऊ शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करणार असल्याची घोषणा केली होती.
OBC column in the census मात्र, सुरू असलेल्या जनगणनेत ओबीसी प्रवर्गाचा उल्लेख टाळणे हे सरकारचे दुपटी धोरण दिसत आहे. या जनगणनेत ओबीसी प्रवर्गाचा समावेश करावा अन्यथा ओबीसी समाज आंदोलन करेल असा ठरावाचे निवेदन नालवाडी ग्रामपंचायतच्या वतीने प्रशासक रवींद्र राठोड व ग्रामपंचायत अधिकारी रामेश्वर चव्हाण, रमेश शहारे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी पंकज काचोळे, बंटी खडसे, विक्रांत चौधरी, महेश शिरभाते, सागर सबाने, ईश्वर मडावी, वैभव सूर्यवंशी उपस्थित होते.