यवतमाळ,
Power Outages in Bajorianagar शहरातील विदर्भ हाऊसिंग सोसायटी अंतर्गत येणाèया बाजोरियानगर परिसरात मध्यरात्री वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिवसांपासून ही समस्या कायम असून यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी एकत्र येत महावितरण कार्यालयात धडक देऊन संबंधित अधिकाèयांना निवेदन सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे की, विशेषतः रात्रीच्या वेळी अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरित परिणाम होत आहे. सध्या उष्णतेचे प्रमाण वाढले असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तींना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा रात्री उशीरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना जागरण करावे लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे.
Power Outages in Bajorianagar वारंवार होणाèया तांत्रिक बिघाडामुळे उपकरणांचे नुकसान होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. अनेक तक्रारी करूनही समस्येचे कायमस्वरूपी निराकरण होत नसल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली. महावितरणने याकडे तातडीने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. भविष्यात ही समस्या उद्भवू नये यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. महावितरणच्या अधिकाèयांनी नागरिकांचे निवेदन स्वीकारून समस्येची गंभीर दखल घेत लवकरच योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बाजोरियानगरातील हरिभाऊ मासोतकर, किशोर सोन्नर, धनंजय पोटपल्लीवार, संकेत वानखेडे, दिलीप गुल्हाने, परवडकर, राठोड, मोरे, निकोडे, सोळंके, मस्कर, अनिकेत वानखेडे, पजगाडे, विठाळे, नितीन खोडे, पवन घोसे, नीरज वाटपाडे नागरिक उपस्थित होते.