चंदीगड,
Punjab Local Body Elections पंजाबमध्ये 8 महापालिका, 75 नगरपालिका, 20 नगरपंचायतीच्या निवडणूक निकालात आम आदमी पक्षाने 203 जागांवर विजय मिळवत बहुतांश ठिकाणी सत्ता कायम राखली. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून, शंभरपेक्षा अधिक जागांवर या पक्षाचे उमेदवार विजयी झाले, या निकालात भाजपा सर्वात पिछाडीवर आहे. निवडणुकीसाठी 26 मे रोजी या जागांसाठी मतदान पार पडले होते.
पंजाबमधील 115 मतमोजणी केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली, जिथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या निवडणुका केवळ स्थानिक सत्तेसाठीची लढाई नसून 2027 च्या विधानसभा निवडणुकांची सेमी फायनल म्हणून याकडे पाहिले जात आहे. पंजाब महानगरपालिका निवडणुकीत आतापर्यंत 358 प्रभागांचे निकाल जाहीर झाले आहेत. ज्यात आम आदमी पक्षाने 178, काँग्रेसने 58 तर शिरोमणी अकाली दलाने 53 जागा जिंकल्या आहेत. भाजपाने 7, तर अपक्षांनी 62 जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे Punjab Local Body Elections हरियाणा नगर परिषद निवडणुकीच्या निकालात आम आदमी पक्षाने 11 पैकी सात प्रभागांमध्ये विजय मिळवला आहे. काँग्रेसने तीन जागा जिंकल्या तर भाजपाला केवळ 1 जागा जिंकता आली आहे.