नागपूर
Farm Water अल-निनोमुळे यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पृष्ठभूमीवर शेतकèयांनी शेतातील पाणी शेतातच मुरविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. सरीवरंबा पद्धतीने शेती करण्याला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
Farm Water कुही तालुक्याच्या दौèयावर असताना किन्ही व बारवा गावात शेतकèयांशी संवाद साधताना ते बोलत होते. अल-निनोसोबतच युद्धामुळे रासायनिक खते व निविष्ठांबाबत आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतून सावरण्यासाठी नैसर्गिक व सेंद्रिय खते-निविष्ठांवर अधिक भर देणे गरजेचे आहे. बांधावर पडणाèया प्रत्येक थेंबाला शेतातच अडवण्यासाठी बांधबंदिस्ती करा, असे जिल्हाधिकाèयांनी स्पष्ट केले.
Farm Water जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, भविष्यात पाण्याचे संकट टाळण्यासाठी पाण्याची बचत करणे आवश्यक आहे. सरीवरंबा पद्धतीमुळे शेतातील पाणी शेतात मुरण्यास मदत होते. पाण्याचा ताण पिकांना कमी प्रमाणात होतो. या भेटीत त्यांनी गावातील पांदण रस्ते व जलजीवन आदी कामांचाही आढावा घेतला.
Farm Water 500 हेक्टरवर सेंद्रिय शेती
किन्ही येथे आत्मामार्फत साकारलेल्या दीपस्तंभ फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीला जिल्हाधिकाèयांनी भेट दिली. या कंपनीशी 25 शेतकरी गट संलग्न असून सुमारे 500 हेक्टर शेती नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने केली जात आहे.