-शरद पोंक्षे यांचे प्रतिपादन
- व्याख्यानाला हाऊसफुल गर्दी
नागपूर,
हिंदू धर्म व हिंदुत्वाची व्यापक संकल्पना Swatantryaveer Savarkar स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनी समाजासमोर आणली, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते व वक्ते शरद पोंक्षे यांनी केले. श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त आयोजित अंदमान एक तीर्थक्षेत्र... या त्रिदिवसीय महोत्सवाच्या दुसर्या दिवशी शुक्रवारी प्रसिद्ध अभिनेते, वक्ते शरद पोंक्षे यांच्या हिंदुत्व... या विषयावरील नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाला श्रोत्यांनी अक्षरशः हाऊसफुल गर्दी केली होती.
श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेडचे अध्यक्ष व प्रख्यात होमिओपॅथ पद्मश्री डॉ. विलास डांगरे, शरद पोंक्षे, भाजप विदर्भ कार्यालयाचे कार्यालय प्रमुख संजय फांजे, श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी महापौर संदीप जोशी, सेल्युलर जेलची प्रतिकृती साकारणारे कलाकार व स्थापत्य प्रफुल्ल माटेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शरद पोंक्षे म्हणाले की, Swatantryaveer Savarkar स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अखंड हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. सेल्युलर जेलमधील अमानुष छळ, हिंदूंवरील भेदभाव व धर्मांतराच्या प्रयत्नांचा अनुभव घेत असताना त्यांनी विविध धर्मग्रंथांचा अभ्यास केला. हिंदुत्व ही केवळ धार्मिक नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक ओळखीची आधारशिला आहे. भाषा, संस्कृती व इतिहास हे त्याच्या अस्तित्वाचे मूलभूत घटक असतात. भाषा व संस्कृतीचा र्हास झाला तर राष्ट्राची ओळखही धोक्यात येते. ब्रिटिशांनी भारतावर राज्य करताना याच नीतीचा अवलंब केला होता. जे इतिहास विसरतात, त्यांचा भूगोल बिघडतो हे वाक्य आजच्या काळातही तितकेच समर्पक असल्याचे त्यांनी नमूद केले.
पोंक्षे यांनी भारतीय ज्ञानपरंपरेचे अधोरेखित करताना सांगितले की, आयुर्वेद, योग, भारतीय सण-उत्सव, पूजा-पद्धती व जीवनशैली या सर्व गोष्टी निसर्गाशी व ऋतुचक्राशी जोडलेल्या आहेत. वेद, उपनिषदे व प्राचीन ग्रंथांमध्ये या परंपरांचे सखोल तत्त्वज्ञान दडलेले आहे. संस्कृत ही त्या ज्ञानपरंपरेची वाहक भाषा असून तिच्यापासून दूर गेल्याने आपण आपल्या सांस्कृतिक मुळांपासूनही दूर जात आहोत, अशी खंत व्यक्त केली.
जगातील सर्वांत प्राचीन व सातत्याने टिकून राहिलेल्या संस्कृतींपैकी सनातन संस्कृती ही एक असल्याचे सांगून, तिचे ज्ञान, मूल्ये व परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
Swatantryaveer Savarkar माजी महापौर संदीप जोशी प्रास्ताविकात महोत्सवाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अंदमानच्या सेल्युलर जेलची वास्तवदर्शी प्रतिकृती उभारणारे प्रफुल्ल यांच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. अंदमानमधील क्रांतिकारकांच्या त्यागाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन नीरज दोन्तुलवार यांनी केले.
उभारण्यात आलेली अंदमानच्या ऐतिहासिक सेल्युलर जेलची भव्य प्रतिकृती व त्यासोबत सादर करण्यात येणारा लाईट अँड साउंड शो हे विशेष आकर्षण ठरत असून नागरिकांकडून मोठी पसंती मिळत आहे.
आज समारोप
उद्या शनिवारी ३० मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता आशुतोष अडोणी यांचे 'समाज क्रांतिकारक सावरकर' विषयावर व्याख्यान.