शालेय विद्यार्थिनींना मिळणार मासिक पाळी रजा?

    दिनांक :29-May-2026
Total Views |
तिरुवनन्तपुरम्
menstrual leave काही वर्षांपूर्वी केरळमधील विद्यापीठातील विद्यार्थिनींना ‘मासिक पाळीच्या रजेची’ सुविधा मंजूर करण्यात आली होती. मात्र, व्ही.डी. सतीशन यांच्या नेतृत्वाखालील नवीन ‘संयुक्त लोकशाही आघाडी’ (यूडीएफ) सरकारने आता शालेय विद्यार्थिनींनाही हा लाभ देऊन एक नवा आदर्श घालून दिला आहे. केरळ सरकार सध्या शाळेत शिकणाèया विद्यार्थिनींना दरमहा तीन दिवसांची ‘मासिक पाळीची रजा’ देण्याबाबत अत्यंत गांभीर्याने विचार करत आहे.
 
menstrual leave 
menstrual leave या क्रांतिकारी प्रस्तावाबाबत राज्याच्या शिक्षण आणि आरोग्य विभागांमध्ये सध्या अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू असून, लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. जर हा निर्णय अंमलात आला, तर मुलींचे आरोग्य आणि कल्याण लक्षात घेऊन शालेय स्तरावर अशी विशेष रजेची तरतूद करणारे केरळ हे देशातील अग्रगण्य राज्य ठरेल.
menstrual leave हे महत्त्वपूर्ण पाऊल का उचलले जात आहे?
दरम्यान, विधानसभेला संबोधित करताना राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी ‘मासिक पाळी सन्मान प्रकल्पाची’ अधिकृत रूपरेषा सादर केली. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या तीव्र वेदना, अशक्तपणा आणि इतर विविध शारीरिक त्रासांमुळे अनेक विद्यार्थिनी शाळेत उपस्थित राहू शकत नाहीत, याची सरकारला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच, त्यांना मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर मोठा दिलासा देण्यासाठी या उपक्रमाचा विचार केला जात आहे. या योजनेअंतर्गत, विद्यार्थिनींना दरमहा तीन दिवसांपर्यंतची मासिक पाळीची रजा घेण्याचा कायदेशीर अधिकार असेल.