बारावीचे ते ११६ विध्यार्थी नापास

वासी (कोरा) येथील शाळेतील सामूहिक कॉपी प्रकार

    दिनांक :03-May-2026
Total Views |
प्रफुल्ल व्यास
वर्धा,
116 students fail दहावी, बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपीवर आळा घालण्यासाठी सरकार, प्रशासन विविध योजनांची अमलबजावणी करते. बोर्डही त्याला साजेसे काम करते. परंतु, काही शाळा सामूहिक कॉपीसाठी कुप्रसिद्ध असतात आणि त्या शाळांचे प्रतिनिधित्व करणारे अधिकारी हा प्रकार केल्याशिवाय राहत नाहीत. समुद्रपूर तालुयातील वासी (कोरा) येथील शाळेत बारावीच्या ११८ विद्यार्थ्यांची बोर्डाच्या परीक्षेतील उत्तर सारखी आल्याचे प्रकरण तरुण भारतने लावून धरले होते. त्या केंद्रावर फिदा असलेल्या नागपूर बोर्डाने अखेर आपले कर्त्याव्य चोख बजावत सामूहिक कॉपी प्रकरणातील ११६ विद्यार्थ्यांना नापास केले आहे.
 
 
116 students fail
 
समुद्रपूर तालुयातील वासी (कोरा) येथील जे. डी. चौधरी ही शाळा सामूहिक कॉपीसाठी कायम कुप्रसिद्ध राहत आली आहे. वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या श्रीमंताची मुलं दहावीची परीक्षा अभ्यास करून उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. त्या मुलांना वासी (कोरा) येथील जे. डी. चौधरी विद्यालयात प्रवेश देऊन हमखास उत्तीर्ण होण्याची शंभर टके गॅरंटी दिली जाते. जे. बी. चौधरी विद्यालयात बारावी उन्हाळी परीक्षेत बॉयोलॉजीचा पेपर झाला. 116 students fail जमा झालेले पेपरचे गठ्ठे मुल्यांकनाकरिता संबंधीत विषयाच्या मॉडरेटरकडे गेले. पेपर तपासताना ११५ विद्यार्थ्यांचे उत्तर सारखी आल्याने याचे बोर्डाकडे मॉडरेटरने तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर या प्रकरण उघडकीस आले. तरुण भारत ने हा विषय चांगलाच लावून धरला होता. पालकमंत्री तथा शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, वर्धेच्या जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. या प्रकरणी बरावीत बॉयोलॉजीचा पेपर देणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना बोर्डात बोलवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. ५०-५० च्या गटातील विद्यार्थ्यांनी चौकशी समितीकडे आपले जवाब नोंदवले होते. काल लागलेल्या निकालात त्या शाळेतील ११६ विद्यार्थी नापास झाले आहेत.
 
 
अनुत्तरीत प्रश्न
बोर्ड, जिल्हाधिकारी, शिक्षण विभाग यांच्या वतीने फिरते पथक, स्थिर पथकाची नियुक्ती केली जाते. याशिवाय प्रत्येक शाळेत दोन पोलीसही नियुक्त केले जातात. 116 students fail हा सर्व लवाजवामा राहत असतानाही या चौधरी शाळेमध्ये सामूहिक कॉपी झालीच कशी या प्रश्नाचे उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे. या शाळेमध्ये जीवशास्त्राचा विषयाची कॉपी करताना करताना प्रत्येक रूम मध्ये टीव्हीवरून उत्तर लिहून देण्यात आले असल्याचेही विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. या शाळेतील बारावीचे सेंटर यापूर्वी रद्द करण्यात आले होते. आता ते कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केलेली आहे.