गडचिरोलीत २४ वर्षीय तरुणाची हत्या

शिवाजी महाविद्यालयाच्या बाजूच्या पटांगणावर संशयास्पद आढळला मृतदेह

    दिनांक :03-May-2026
Total Views |
गडचिरोली,
24-year-old youth murdered 3 एप्रिल. शहरातील धानोरा रोडवरील शिवाजी कॉलेजसमोरील मारलीवार यांच्या खुल्या मैदानात एका २४ वर्षीय शीख तरुणाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने गडचिरोली शहरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
 
24-year-old youth murdered
 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतकाचे नाव हरबचनसिंग खन्ना सिंग पटवा (वय २४, रा. गोकुळ नगर) असे असून तो स्थानिक पातळीवर परिचित होता. सकाळच्या वेळी मैदानात फिरण्यासाठी व व्यायामासाठी आलेल्या काही नागरिकांना आणि मुलांना हा मृतदेह प्रथमदर्शनी दिसून आला. 24-year-old youth murdered घटनेची गंभीरता लक्षात घेता त्यांनी तात्काळ ही माहिती परिसरातील नागरिक, मृतकाच्या नातेवाईक आणि पोलिसांना कळवली.
 
घटनास्थळी आढळलेल्या परिस्थितीनुसार, मृतकाच्या नाक, तोंड तसेच गुप्तांगातून रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मृत्यू नैसर्गिक नसून संशयास्पद असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मृतकाच्या कुटुंबीयांनी ही घटना अपघाती किंवा नैसर्गिक नसून थेट हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. 24-year-old youth murdered अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी त्याला लक्ष्य करून त्याची हत्या केली व पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मैदानात फेकून दिल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
 
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून परिसराची नाकाबंदी केली व उपस्थित नागरिकांकडून प्राथमिक माहिती संकलित केली. 24-year-old youth murdered त्यानंतर मृतदेह पुढील तपासासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
दरम्यान, फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पोहोचून अत्यंत बारकाईने तपास सुरू केला आहे. जमिनीवरील चिन्हे, पावलांचे ठसे, रक्ताचे डाग तसेच इतर भौतिक पुरावे यांची तपासणी करण्यात येत असून, कोणताही धागा सुटू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 24-year-old youth murdered विशेष बाब म्हणजे, घटनास्थळी कोणतेही हत्यार किंवा संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. मात्र, मृतकाची दुचाकी चावी लावलेल्या अवस्थेतच जवळ उभी आढळली आहे. यामुळे हा प्रकार नेमका कसा घडला, मृतक त्या ठिकाणी स्वतः आला होता की त्याला जबरदस्तीने आणण्यात आले, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
सदर मैदान हे शहरातील वर्दळीच्या आणि रहिवासी भागाच्या अगदी जवळ असल्याने या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सकाळच्या वेळेत घडलेल्या या प्रकारामुळे विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 24-year-old youth murdered  सध्या गडचिरोली पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, मृतकाच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, सीसीटीव्ही फुटेज, तसेच त्याच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. लवकरात लवकर या घटनेचा उलगडा करून दोषींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण शहरात चर्चांना उधाण आले असून, नागरिकांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे.