तिरुपतीत ‘स्पेस सिटी’चा धमाका आंध्र बनणार भारताचा 'रॉकेट हब'

    दिनांक :03-May-2026
Total Views |
तिरुपती
Tirupati space hub India भारताच्या अंतराळ क्षेत्रात मोठी झेप घेण्याच्या दिशेने आंध्र प्रदेश सरकारचा महत्त्वाकांक्षी ‘स्पेस सिटी’ प्रकल्प आता प्रत्यक्षात आकार घेत असून जून २०२६ पासून रॉकेट निर्मिती आणि संबंधित उद्योगांना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पामुळे राज्य देशातील प्रमुख एरोस्पेस आणि अंतराळ तंत्रज्ञान केंद्र म्हणून उदयास येण्याच्या मार्गावर आहे.
 

Andhra Pradesh Space City project, Tirupati space hub India, 
तिरुपती परिसरात सुमारे २,८०० एकर क्षेत्रावर हा ‘स्पेस सिटी’ प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पात रॉकेट उत्पादन, असेंब्ली, चाचणी, उपग्रह निर्मिती तसेच संशोधन आणि विकासासाठी अत्याधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात सुमारे ५७० एकर क्षेत्रात मुख्य औद्योगिक कामकाज सुरू करण्यात येणार असून यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक प्रस्तावित आहे.
या प्रकल्पासाठी खासगी अंतराळ Tirupati space hub India क्षेत्रातील आघाडीची कंपनी स्कायरूट एरोस्पेस हिला काम देण्यात आले आहे. कंपनी सुमारे ३०० एकर जागेवर रॉकेट उत्पादन, साठवण, असेंब्ली आणि चाचणीसाठी एकात्मिक केंद्र उभारणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.तिरुपती परिसराची निवड ही श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या जवळीकतेमुळे करण्यात आली आहे. यामुळे रॉकेट प्रक्षेपण, चाचण्या आणि लॉजिस्टिक साखळी सुलभ होणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे हजारो कुशल रोजगार निर्माण होण्याची शक्यता असून संबंधित उद्योगांनाही मोठा चालना मिळणार आहे.
 
 
राज्य सरकारच्या एरोस्पेस Tirupati space hub India  आणि डिफेन्स धोरणाअंतर्गत हा प्रकल्प विकसित केला जात असून, पुढील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्याचा सरकारचा उद्देश आहे. ‘स्पेस सिटी’मध्ये उपग्रह एकत्रीकरण, परीक्षण प्रयोगशाळा, स्टार्टअप इनक्युबेशन केंद्रे आणि डेटा अ‍ॅनालिटिक्ससारख्या पूरक उद्योगांचाही समावेश असणार आहे.दरम्यान, केंद्र सरकारच्या धोरणांनुसार खासगी क्षेत्राला अंतराळ क्षेत्रात अधिक संधी मिळत असल्याने अशा प्रकल्पांना वेग येत आहे. आंध्र प्रदेश सरकारचा हा उपक्रम देशाला जागतिक अंतराळ स्पर्धेत अधिक बळकट स्थान मिळवून देईल, असा विश्वास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.या पार्श्वभूमीवर, जून २०२६ पासून रॉकेट उत्पादनाला प्रारंभ होणे हे भारताच्या अंतराळ उद्योगासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.