अन्वी भोसलेचा मृत्यू उष्माघाताने नाही

प्रशासनाचे स्पष्टीकरण

    दिनांक :03-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Anvi Bhosale death case नेर तालुक्यातील आजंती येथील पारधी बेड्यावरील अन्वी अनाडी भोसले या 9 वर्षीय मुलीचा दिवसभर पाण्यासाठी भटकत असताना चक्कर येऊन मृत्यू झाल्याचा संदेश दिवसभर समाज माध्यमावर फिरत होता. या संदर्भात प्रशासनाने तिचा मृत्यू उष्माघाताने झाला नसल्याचे स्पष्ट केले.
 

Anvi Bhosale death case 
या संदेशाच्या अनुषंगाने सत्यता जाणून घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, तालुका आरोग्य अधिकारी यांचे पथक, पोलिस पथक, तसेच पंचायत समितीचे अधिकारी यांनी आजंती पारधी बेड्याला भेटी दिल्या आहेत.
गटविकास अधिकारी यांच्यानुसार टंचाई सदृश्य परिस्थिती नसल्यामुळे अद्याप विहीर अधिग्रहण प्रस्ताव प्राप्त नाही, परंतु पुढे जर पाणी टंचाई निर्माण झाली तर तशी व्यवस्था करण्यात येणार आहे.पोलिस विभागाच्या माहितीनुसार त्यांच्याकडे या मृत्यूबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अनैसर्गिक मृत्यूबाबत शवविच्छेदन केल्या जाते, परंतु मुलीला दवाखान्यातच आणण्यात आले नसल्याने शवविच्छेदन सुद्धा झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
मुलीला कोणत्या Anvi Bhosale death case  दवाखान्यात नेण्यात आले होते, कोणत्या डॉक्टरने मृत घोषित केल्यावर अंत्यविधी करण्यात आला, शवविच्छेदन का करण्यात आलेले नाही, यांबाबत कुटुंबियाचा लेखी जबाब मागवण्यात आला आहे. त्यांच्या उत्तरानुसार मुलगी उभी असताना चक्कर येऊन पडली होती.
ही बातमी आल्यावर सर्व प्रशासकीय यंत्रणा बेड्यावर पोहचल्या असता मुलीचा मृतदेह आधीच पुरण्यासाठी नेल्याचे आढळून आले. शवविच्छेदन न झाल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. तसेच प्राथमिक चौकशी दरम्यान संध्याकाळी 7 वाजता मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी उष्मघाताने मृत्यू होण्याची शक्यता नाही, अशी माहिती नेरचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी दिली आहे.