देवळी,
banana-crop-destroyed : भिडी परिसरात शनिवार २ रोजी रात्री झालेल्या वादळी वार्यामुळे शेती व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेषत: केळी, पपई व तिळाच्या पिकांना मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची माहिती समोर आली आहे.
शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वारा, मेघगर्जना सुरू झाली होती. वादळ सुरू होताच देवळीसह अनेक गावांतील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता.
बाभूळगाव (खोसे) येथील शेतकरी जीवन ढोक यांच्या तीन एकर क्षेत्रातील केळीचे पीक वार्याने आडवे झाले. हातात येणारे पीक वादळामुळे नष्ट झाल्याने शेतकरी ढोक मोठ्या आर्थिक संकटात सापडले. याशिवाय काही ठिकाणी घरांवरील टिनपत्रे उडाली तर अनेक वृक्ष कोलमडून पडले. उन्हाळ्यामुळे घरांवर वाळवलेले धान्यही वादळात सापडले ते गोळा करणेही झाले नाही. शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.