चेन्नई,
Chennai airport incident, चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी सकाळी एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार घडला. शारजाहहून चेन्नईकडे आलेल्या एअर अरेबिया विमानातील एका प्रवाशाने विमान टॅक्सीवेवर (रनवेहून टर्मिनलकडे जात असताना) असताना अचानक इमर्जन्सी एक्झिट दरवाजा उघडल्याने विमानात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे २३१ प्रवाशांना घेऊन आलेले हे विमान लँडिंगनंतर टर्मिनलकडे जात असताना ही घटना घडली. विमान हळूहळू टॅक्सी करत असताना ३४ वर्षीय प्रवाशाने अचानक आपत्कालीन दरवाजा उघडला. या अनपेक्षित प्रकारामुळे पायलटने तात्काळ विमान थांबवले आणि विमानतळ प्राधिकरण तसेच सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि बॉम्ब शोध पथकासह सुरक्षा पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तातडीने विमानात प्रवेश करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि संबंधित प्रवाशाला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली असून त्याची मानसिक स्थिती तपासली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेमुळे काही काळ Chennai airport incident, विमानतळावरील हालचालींमध्ये अडथळा निर्माण झाला. विमान थांबवल्यामुळे पुढील उड्डाणालाही उशीर झाला. मात्र सुरक्षा तपासणीनंतर विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरळीत करण्यात आले.विमानातील प्रवाशांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण झाला नसल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तथापि, अशा प्रकारच्या कृतीमुळे विमान सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेबाबत अधिक तपास सुरू असून संबंधित प्रवाशाने असे पाऊल का उचलले याचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.