तभा वृत्तसेवा
उमरखेड,
clash-between-two-groups : तालुक्यातील विडूळ येथे शनिवार, 2 मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डीजे न लावण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण होऊन तो हिंसक संघर्षात परिवर्तित झाला. या घटनेत खंजीर हल्ला, मारहाण तसेच मालमत्तेची तोडफोड झाल्याची घटना घडली.
सुरेश उर्फ राहुल मुनेश्वर हे सकाळी 10 च्या सुमारास मित्रासोबत बुद्ध विहारामागे उभे असताना दत्तशिष धुळे व त्याचे सहकारी त्यांच्याजवळ आले. संघर्ष धुळेला शिव्या का दिल्या या कारणावरून वाद झाला.
यानंतर इतर साथीदारांनीही हातात टिकास, गज, कुèहाड घेऊन मारहाण करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप मुनेश्वर यांनी केला आहे. तसेच त्यांची दुचाकी दगड-विटांनी फोडून सुमारे 25 हजार रुपयांचे नुकसान केले आहे.
दुसèया गुन्ह्यात दत्तशिष मिलिंद धुळे याने दिलेल्या तक्रारीत सुरेश मुनेश्वर व दयानंद उर्फ मास मुनेश्वर यांनी त्यांना अडवले. किरकोळ कारणावरून वाद घालत दयानंदने दुचाकीवरून खाली ओढले. त्यानंतर सुरेशने खंजीराने गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. तो वार हाताने अडवल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली. पुन्हा वार करण्याचा प्रयत्न होत असताना त्यांनी प्रसंगावधान राखून तेथून पळ काढला.
दोन्ही घटनांमागे 14 एप्रिल रोजी झालेल्या आंबेडकर जयंती मिरवणुकीत डीजे न लावता ढोल-ताशांचा वापर केल्याचा वाद कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे. या वादातूनच दोन्ही गटांमध्ये जुना राग वाढून संघर्ष उफाळला असल्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दोन्ही प्रकरणी विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. ठाणेदार शंकर पांचाळ व अधिकाèयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सहपोलिस निरीक्षक विनायक राठोड व जमादार दिलीप चव्हाण करीत आहेत.