तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Sanjay Rathod दारव्हा शहरातील विकासकामांमुळे शहराचे रूप बदलत असून कायापालट होत आहे. येणाऱ्या काळात दारव्हा शहराच्या वैभवात भर पडणाèया गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी केले.
दारव्हा पोलिस ठाण्याच्या Sanjay Rathod नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या लोकार्पण समारंभाला खासदार संजय देशमुख, पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, सहपोलिस अधीक्षक तेजस सारडा, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, दारव्हा नगर परिषद अध्यक्ष सुनील चिरडे, अधीक्षक अभियंता सुषमा बोंद्रे, उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, तहसीलदार राजेश पौळ, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, ठाणेदार शिवप्रकाश मुळे, नेरचे ठाणेदार अनिल बेहराणी व दारव्ह्यातील पोलिस अधिकारी, अंमलदार, पोलिस पाटील व नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, दारव्हा शहरासाठी आनंदाचा क्षण, पोलिस प्रशासनासाठी सुसज्ज इमारत बांधण्याचा करण्याचा मानस होता. या इमारतीचे भूमीपूजन आणि लोकार्पण आमच्या हस्ते होणे हा विलक्षण क्षण आहे. 1919 च्या स्वातंत्र्यपूर्व काळातील ही इमारत होती. अपुèया सुविधेत पोलिस प्रशासन सेवा देत होते.
पालकमंत्री म्हणून दखल घेऊन जिल्हा नियोजन निधीमधून या पोलिस ठाण्याच्या प्रशासकीय इमारतीसाठी 11 कोटींचा निधी दिला. आज सुसज्ज इमारत उभी झाल्याचा आनंद आहे. सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत, सुरक्षित दारव्हा घडविण्याचा संकल्प करावा. या इमारतीला पोलिस ठाणे नव्हे तर मंदिर असल्याची भूमिका ठेवून काम करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.दारव्हा शहरातील रस्त्याच्या कामाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत चर्चा केली आहे. रिंग रोडच्या सर्व्हेसाठी निधी दिला आहे. दारव्हा शहरात डायलिसीस सेंटर सुरू झाले आहे, अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी दिली.
खासदार संजय देशमुख म्हणाले, दारव्हा पोलिस ठाणे इमारतीच्या भूमीपूजनावेळी चांगली इमारत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. ती आज प्रत्यक्षात आली. कायदा व सुविधा राखण्यासह नागरिकांना चांगली वागणूक आणि चांगले वातावरण मिळण्याच्या दृष्टीने ही सुसज्ज इमारत निर्माण झाली आहे.
या प्रसंगी पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनीही मनोगत व्यक्त करून पालकमंत्र्यांसह खासदारांचे आभार मानले. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांनी प्रास्ताविकात पोलिस ठाणे इमारतीमधील सोयीसुविधांची माहिती दिली. तर ठाणेदार शिवप्रकाश मुळे यांनी आभार मानले.
दारव्हा शहरात विकासकामांचा धडाका
दारव्हाच्या विकासासाठी आतापर्यंत Sanjay Rathod भरीव निधी दिला आहे. त्यामध्ये पंचायत समिती इमारतीसाठी 18 कोटी मंजूर झाले असून, उपविभागीय कार्यालयासाठी 15 कोटी, वीज समस्या सोडविण्यासाठी 25 कोटी, ट्रान्सफॉर्मरसाठी 10 कोटी दिले आहेत. नगर परिषद माध्यमातून राज्यातील पहिले वृद्धाश्रम होणार असून त्यासाठी 5 कोटी मंजूर केले आहेत. यासह अत्याधुनिक क्रीडा संकुल 20 कोटी, अभ्यासिका, नगरभवन, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसाठी 8 कोटी, नवीन बचत भवन, सांस्कृतिक भवन, चौकांचे सौंदर्यीकरण, नवीन व्यापारी संकुल, नाल्या, नवीन बस स्थानकासाठी निधी, बेरोजगारांसाठी 500 गाळे, तर महिलांच्या व्यवसायासाठी गाळे, महिलांसाठी पिंक टॉयलेट निर्माण करणार आहोत.