नागपूर,
Daytime electricity usage दिवसा वीज वापरून राज्यातील 70 लाख ग्राहकांनी एकूण 2235 कोटी रुपये लाभ मिळवला असून त्यात 15,907 उच्चदाब औद्योगिक ग्राहक एकूण 1534 कोटी रुपये लाभासह प्रथम स्थानावर आहेत, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली. या वीज ग्राहकांनी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज वापरासाठी टीओडी सवलत जुलै 2025 पासून घेतली आहे.
विजेचा वापर कोणत्या वेळेत झाला त्याच्या आधारे वीजदरात सवलत दिली जाते, त्याला टीओडी सवलत म्हणतात. जुलै 2025 पासून 10 किवॅपेक्षा जास्त भार असलेल्या औद्योगिक, वाणिज्यिक वीज ग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीतील वीज वापरासाठी सवलत देण्यात आली. Daytime electricity usage या ग्राहकांना एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यांसाठी 15 टक्के तर ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांसाठी 25 टक्के सवलत दिली जात आहे.
औद्योगिक ग्राहकांमध्ये उच्च दाब, उच्चदाब हंगामी, लघुदाब व यंत्रमाग ग्राहक असा एकत्रित विचार केला तर 43,911 औद्योगिक ग्राहकांना एकूण 1,774 कोटी रुपये लाभ झाला आहे. Daytime electricity usage राज्यातील उच्चदाब व लघुदाब अशा 11,017 वाणिज्यिक ग्राहकांना एकूण 239 कोटी रुपये लाभ झाला आहे.
घरगुती ग्राहकांना टीओडीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाल्यापासून त्यांना 1,096 दशलक्ष युनिट इतक्या विजेसाठी 89 कोटी रुपये लाभ झाला आहे. या कालावधीतील लाभधारक घरगुती ग्राहकांची संख्या 69,35,388 इतकी होती. Daytime electricity usage सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीतील वीजदरातील सवलतीचा लाभ सार्वजनिक पाणीपुरवठा व अन्य सार्वजनिक सेवांसाठीही झाला आहे. या घटकांसाठी संबंधित 12,989 ग्राहकांना 202 कोटी रुपये टीओडी लाभ झाला आहे.
सौर ऊर्जेसारख्या नवीकरणीय उर्जेची उपलब्धता वाढली आहे. ही वीज स्वस्त मिळत असल्याने महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार दिवसाच्या वीजवापरासाठी सवलत लागू केली आहे. Daytime electricity usage वीज ग्राहकांनी अधिक विजेची गरज असणारी उपकरणे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत प्राधान्याने वापरून टीओडी सवलतीचा अधिकाधिक लाभ घ्यावा.
सर्व घरगुती ग्राहकांनाही प्रथमच टीओडी सवलतीचा लाभ देण्यास सुरुवात झाली असून चालू आर्थिक वर्षात सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीतील वीज वापरासाठी प्रति युनिट 85 पैसे सवलत दिली जाते. Daytime electricity usage कोणत्या वेळी किती वीज वापरली हे मोजण्याची सुविधा असल्याने स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना या सुविधेचा लाभ होत आहे.