डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बारावी बोर्ड परीक्षेत उत्तुंग भरारी

    दिनांक :03-May-2026
Total Views |
गपूर,
Dr. Ambedkar College डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने यंदाच्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत पुन्हा एकदा उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्ही शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचा लौकिक उंचावला आहे.विज्ञान शाखा प्रेयांश संजय देशमुख (93.5%),आनंदी सुधीर तायडे (93%),क्रिष्णा पंकज बसतवार (91.5%),जानवी प्रकाश शर्मा (90.17%),सेजल ईश्वरदास बाहेकर (90%)
 
 

college 
 
 
वाणिज्य शाखा :अतिथी प्रियसेन शेंडे – (96%), विधिशा गणेश मेश्राम – (94.17%),युगल तुकाराम पवनीकर – (93.50%),सलोनी सुनील सिरिया ,श्रुती मल्लेश गांधारला (88.17%),हर्षला धनराज सहारे (85.50%)दिव्यांग प्रवर्गात आदित्य प्रल्हाद मंगल यांनी 509 गुण (84.83%) मिळवत चौथी मेरिट मिळवली, तर दीपक गजानन बोडखे यांनी 467 गुण (77.83%) मिळवत कला शाखेत विशेष कामगिरी केली.या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई (अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती), डॉ. सुधीर फुलझेले (सचिव) तसेच व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी प्राचार्या डॉ. दीपा पान्हेकर, उपप्राचार्या हर्षा बोरकर, विभागप्रमुख प्रा. विकास सिडाम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सौजन्य:प्रफुल ब्राह्मणे,संपर्क मित्र