मुंबई
Ek Din movie आमिर खान प्रॉडक्शन्सचा आगामी चित्रपट ‘एक दिन’ सध्या सिनेप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. एक नाजूक, मनाला भिडणारी आणि जादुई प्रेमकथा म्हणून ओळखली जाणारी ही फिल्म तिच्या आकर्षक ट्रेलर आणि सुरेल गाण्यांमुळे लोकांच्या पसंतीस उतरली आहे. या चित्रपटात जुनैद खान एका अत्यंत लाजाळू मुलाचा रोल साकारत आहे, जो साई पल्लवी साकारत असलेल्या आत्मविश्वासू आणि मिसळखोर मुलीच्या प्रेमात पडतो. विशेष म्हणजे, आमिरला ही कथा त्याच्या स्वतःच्या स्वभावाशीही जोडलेली वाटते
जुनैद खानच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना आमिर म्हणाला, “ही कथा एका अशा मुलाची आहे, जो खूप संकोची आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवत नाही. तो विचार करतो की मी एखाद्या मुलीशी कसं बोलू? तुम्ही त्याला आत्मविश्वास कमी असलेला म्हणू शकता. माझ्याही आयुष्यात 16, 17, 18 वयाच्या काळात मी असाच होतो. खूप लाजाळू होतो आणि मला वाटायचं की मुली माझ्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे मला खात्री होती की मला आयुष्यात कोणी मिळणार नाही.”त्याने पुढे सांगितले की, “‘एक दिन’मधील नायकाचीही अशीच मानसिकता आहे. त्यालाही वाटतं की कोणतीही मुलगी त्याला पसंत करणार नाही. मी त्यासाठी योग्य नाही. जेव्हा मी ही कथा ऐकली, तेव्हा मला वाटलं ही तर माझीच कथा आहे!”
‘एक दिन’ या चित्रपटाद्वारे Ek Din movie आमिर खान आणि मंसूर खान ही गाजलेली जोडी पुन्हा एकत्र आली आहे. याआधी त्यांनी ‘कयामत से कयामत तक’ आणि ‘जो जीता वही सिकंदर’ सारखे क्लासिक चित्रपट दिले आहेत. या चित्रपटात साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत असून सुनील पांडे यांनी दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट आज, 1 मे 2026 रोजी प्रदर्शित झाला आहे.