जिवती,
fire-in-nanakpathar : तालुक्यातील नानकपठार येथे रविवार, 3 मे रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे जनावरांचे खाद्य, कडबा, कुटार व लाकडे जळून खाक झाले. वादळी वार्यामुळे शेतात लागलेल्या आगीची ठिणगी कडबा व कुटाराच्या ढिगार्यावर पडल्याने ही दुर्घटना घडण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात सुदैवाने कुठलीही मनुष्य किंवा पशू हानी झाली नाही. मात्र जनावरांचे खाद्य जळून खाक झाल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक विभागाच्या जवानांनी प्रयत्न सुरू केले. शेतकर्यांनी दुपारच्या सुमारास शेतातील पालापाचोळा जाळला. यावेळी सोसाट्याचा वारा सुरू झाल्याने आगीच्या ठिणग्या कडबा व कुटारवर पडल्या. यावेळी तिथे पडलेल्या पाला पाचोळ्याने पेट घेतला. सर्वप्रथम आगिने शेतालगत असलेल्या अनंता बळवंत बावळे यांच्या गुरा-ढोरांचे खाद्य कवेत घेतले. त्यानंतर ही आग संपूर्ण वस्तीत पसरली. एकमेकांना लागून असलेले घरे आणि उन्हाळ्यामुळे वाढलेल्या पालापाचोळ्याने आगीत इंधनासारखे काम केले ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
या आगीत शेषराव बळवंत बावळे, विष्णू बाबु मरेवाड या शेतकर्यांचेही वर्षभरासाठी गुरा-ढोरांकरिता जमा करून ठेवलेला लाखो रुपयांच्या कडबा, कुटर, जळून खाक झाला. महेश देवकते, सतीश उपलेंचीवार यांच्या सहकार्याने जिवती नगरपरिषद, जिवती नगरपंचायत जिवती व माणिकगड सिमेंट, कंपनीच्या अग्निशामक विभागाच्या वाहनाने आगीवर नियंत्रण मिळविले.