जनसंपर्कात मोठा दिलासा
नागपूर,
citizens problems केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात पुन्हा एकदा नागरिकांनी समस्यांवर तात्काळ निकालाची प्रचिती घेतली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या व तक्रारींवर त्याच क्षणी उपस्थित अधिकाèयांना कार्यवाहीच्या सूचना नितीन गडकरींनी दिल्या. काही प्रकरणांमध्ये फोनवरून संबंधिताना तातडीने समस्या सोडविण्याचे निर्देश दिलेत.
वाढते तापमान लक्षात घेता यंदा सकाळच्याच सत्रात जनसंपर्क कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सकाळी 8.30 वाजेपासून नागरिकांची निवेदने स्वीकारण्यात आली. नितीन गडकरी यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत कार्यवाहीचा विश्वास दिला. महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय आदी शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी जनसंपर्क कार्यक्रमाला उपस्थित होते. citizens problems नागरिकांच्या तक्रारी ऐकताना गडकरींनी थेट संबंधित अधिकाèयांना लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या.
सकाळी साडेसात वाजेपासूनच नागरिकांनी जनसंपर्क कार्यालयात गर्दी केली होती. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी, धार्मिक संस्थानांचे पदाधिकारी आदींनी यावेळी आपली निवेदने गडकरी यांना दिलीत. विद्यार्थ्यांनी परीक्षा व निकालाच्या संदर्भात आपल्या अडचणी मांडल्या. केवळ नागपूरच नव्हे तर परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला, सोलापूर, कोल्हापूरसह इंदोर, बालाघाट, जबलपूर या महाराष्ट्राबाहेरील शहरांमधूनही नागरिक आपली निवेदने घेऊन जनसंपर्क कार्यक्रमात दाखल झाले होते.
गडकरींचे मानले आभार
विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून उपचारासाठी मिळणारी मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेक रुग्णांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले. citizens problems मंत्री महोदयांनी दिलेला शब्द व कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेला पाठपुरावा यामुळेच ही मदत मिळणे शक्य झाल्याची भावना रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.