पुलगाव,
garbage-fire-at-dumping-ground : पुलगाव फर्टिलायझर कारखान्याजवळील नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवरील कचर्याला अचानक आग लागली. ही घटना शनिवार २ रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच सीएडी कॅम्प आणि नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविले.
पुलगाव नगरपालिकेने शहरात गोळा केलेला कचरा विदर्भ फॉस्फेट्स फर्टिलायझरच्या समोरच्या डम्पिंग ग्राउंडवर प्रक्रियेसाठी जमा केला जातो. शनिवारी रात्री ७.३० वाजता डम्पिंग ग्राउंडवरील कचर्याला आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की, नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि पुलगाव एम्युनिशन डेपोच्या अग्निशमन दलाने अतिपरिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. घटनास्थळी नगरसेवक रवी केसरवानी, समीर जगनाडे, सुनील ब्राह्मणकर, शेख नाजिम यांनी धाव घेऊन मदतकार्याचा आढावा घेत सहकार्य केले.