ज्योतिबा कनिष्ठ महाविद्यालयाचा 97% निकाल

    दिनांक :03-May-2026
Total Views |
नागपूर,
Jyotiba Junior College उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेद्वारा संचालित ज्योतिबा कनिष्ठ महाविद्यालयाने यंदा 97% असा उल्लेखनीय निकाल नोंदवला असून विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले आहे.
 

10th 
 
 
वाणिज्य शाखेत वैष्णवी लिखार हिने 87% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला, तर कला शाखेत विशाल बडगे याने 76% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. Jyotiba Junior College या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश चतुर्वेदी, सचिव आभा चतुर्वेदी, प्राचार्या अरुणा कडू, पर्यवेक्षक जांबुवंत वांढे तसेच सर्व शिक्षकांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सौजन्य:जांबुवंत वांढे, संपर्क मित्र