मुंबई
Kalyan Titwala clash मराठी-हिंदी भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सामाजिक वातावरण आधीच संवेदनशील असताना कल्याणजवळील टिटवाळा परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मोरया नगरी परिसरात पाण्याच्या पाइपलाइन दुरुस्तीवरून झालेल्या वादातून एका मराठी कुटुंबावर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक रहिवासी योगेश शिंदे यांच्या घराजवळील पाणी पाइपलाइनमध्ये वारंवार गळती होत असल्याने त्यांनी संबंधित बिल्डरकडे तक्रार केली होती. मात्र दुरुस्तीबाबत समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने रहिवाशांनी स्वखर्चाने काम करण्याचा निर्णय घेतला. याबाबत शेजारी राहणाऱ्या सुनील भाटन यांना माहिती देऊन सहमतीही घेतल्याचे सांगितले जात आहे.
तथापि, दुरुस्तीच्या कामाच्या Kalyan Titwala clash वेळी अचानक वाद निर्माण झाला आणि तो काही क्षणांतच हाणामारीत परिवर्तित झाल्याचा आरोप आहे. योगेश शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, सुनील भाटन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शिवीगाळ करत त्यांच्यावर तसेच त्यांच्या आईवर बांबूने हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती मिळताच मनसेचे स्थानिक पदाधिकारी दिलीप राठोड आणि अविनाश शिकवंदे यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेत पीडित कुटुंबाला मदत केली. तसेच संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाची Kalyan Titwala clash गंभीर दखल घेत टिटवाळा पोलिसांनी तपास सुरू केला असून दोन्ही बाजूंची चौकशी केली जात आहे. प्राथमिक तक्रार प्राप्त झाली असून सर्व पुरावे आणि जबाबांची पडताळणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून वादाचे मूळ कारण आणि प्रत्यक्ष परिस्थिती काय होती याबाबत पोलिस तपासातून अधिक स्पष्टता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.