वाशीम,
Dattatreya Bharane महाबीजच्या माध्यमातून शेतकर्यांना केवळ दर्जेदार बियाणेच नव्हे, तर सेंद्रिय शेती, मातीची सुपीकता वाढविणारी उत्पादने आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. नव्याने विकसित करण्यात आलेली निमास्त्र, महास्पीड, महाबीज कर्बमापक व आर. व्ही. एस. एम. २०११-३५ ही उत्पादने शेतकर्यांच्या उत्पादनवाढीसोबतच खर्चात बचत करून शेती अधिक समृद्ध करण्यास हातभार लावतील. अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज) यांनी शेतकर्यांच्या उत्पादनवाढीबरोबरच सेंद्रिय, शाश्वत आणि आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी नव्याने विकसित केलेल्या विविध उत्पादनांचे लोकार्पण कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. Dattatreya Bharane महाबीजच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त महाबीजने नाविन्यपूर्ण अशी चार नवी उत्पादने विकसित केली आहेत. यामध्ये सेंद्रिय कीडनियंत्रण, जलद कचरा व्यवस्थापन, माती परीक्षण तसेच उच्च उत्पादनक्षम सोयाबीन वाणांचा समावेश आहे.
महाबीजने सादर केलेल्या उत्पादनांमध्ये निमास्त्र या अतिसूक्ष्म निंबोळी पावडरचा समावेश असून हे उत्पादन पिकांवरील किडींचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी उपयुक्त आहे. हे सेंद्रिय शेतीसाठी लाभदायक असून, वापरण्यास सोपे आणि सर्वत्र माफक दरात उपलब्ध आहे. Dattatreya Bharane पर्यावरणपूरक नैसर्गिक संरक्षण म्हणूनही हे उत्पादन महत्त्वाचे मानले जात आहे. तसेच महास्पीड हे जलद विघटक उत्पादन हिरव्या कचर्याचे दर्जेदार सेंद्रिय खतामध्ये जलद रूपांतर करते. यामुळे कचरा व्यवस्थापन सुलभ होऊन जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. रासायनिक खतांवरील खर्चात बचत होण्यासही हे उत्पादन उपयुक्त ठरणार आहे.
निमास्त्र, महास्पीड व महाबीज कर्बमापक या उत्पादनांचे तंत्रज्ञान भाभा अनुसंधान केंद्र, मुंबई येथून प्राप्त करून या तीन उत्पादनांची निर्मिती करण्यात आली आहे. Dattatreya Bharane महाबीजच्या या नव्या उत्पादनांमुळे शेतकर्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, जमिनीची गुणवत्ता सुधारणा आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार असल्याचे मत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, Dattatreya Bharane महाबीजचे गुणवत्ता नियंत्रण महाव्यवस्थापक प्रफुल्ल लहाने, विपणन महाव्यवस्थापक विजय कुमार देशमुख, महाबीज जिल्हा व्यवस्थापक सागर सावरकर, बीज परीक्षण अधिकारी राजेश पाटील तसेच गुणवत्ता नियंत्रण जिल्हा व्यवस्थापक रवी कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.