नवी दिल्ली,
Vivek Vihar नवी दिल्लीतील विवेक विहार परिसरात मध्यरात्रीनंतर भीषण आग लागून सहा फ्लॅट्स जळून खाक झाले असून या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. अचानक लागलेल्या आगीने अल्पावधीतच विकराळ रूप धारण केले आणि इमारतीतील दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या मजल्यावरील घरांना वेढा घातला. Vivek Vihar अग्निशमन दलाला पहाटे साडेतीनच्या सुमारास माहिती मिळताच तातडीने गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. बचाव पथकांनी तत्परतेने कारवाई करत इमारतीत अडकलेल्या अनेकांना बाहेर काढले.
या इमारतीत सुमारे आठ कुटुंबे राहत होती. बचावकार्यादरम्यान दहा ते पंधरा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले, त्यापैकी काहींना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Vivek Vihar घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांसह पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि इतर यंत्रणा उपस्थित होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असले तरी परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गाझियाबादमधील इंदिरापुरम येथेही अशाच प्रकारची मोठी आग लागली होती. त्या घटनेतही अनेक मजल्यांपर्यंत ज्वाळा पसरल्याने मोठी खळबळ उडाली होती. Vivek Vihar विवेक विहारमधील या ताज्या दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये पुन्हा एकदा सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.