न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेजचा HSC मध्ये उत्कृष्ट निकाल

    दिनांक :03-May-2026
Total Views |
नागपूर,
New English Junior College काँग्रेस नगर येथील न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेजने फेब्रुवारी २०२६ च्या HSC परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले असून विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.विज्ञान शाखेत श्रेयस योगेश परांजपे यांनी 90.00% (540/600) गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. रसायनशास्त्र (98), जीवशास्त्र (92) व भौतिकशास्त्र (91) या विषयांत त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. सौम्या सुगत ठुलकर यांनी 80.67% (484/600) गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला.
इंग्रजी माध्यम वाणिज्य शाखेत तेजस नंदकिशोर भुंबर यांनी 91.67% (550/600) गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. लेखाशास्त्र (98), IT (96) व SP (95) या विषयांत त्यांनी उत्कृष्ट गुण मिळवले. यश जगदीश सावळकर यांनी 81.83% (491/600) गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला.
 

datt 
 
 
 
मराठी माध्यम वाणिज्य शाखेत दिपाली राजेश वानखेडे New English Junior College यांनी 52.17% (313/600) गुणांसह प्रथम क्रमांक, तर आचल किशोर आंबाडे यांनी 48.67% (292/600) गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला.महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी भविष्यातही असेच यश संपादन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य नरेंद्र रंगारी, पर्यवेक्षिका पाडळकर मॅडम व सर्व शिक्षक-कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

सौजन्य:चंद्रशेखर इंगळे,संपर्क मित्र