नक्षलग्रस्त भागात महाराष्ट्र दिनाचा देशभक्तीपूर्ण जल्लोष

    दिनांक :03-May-2026
Total Views |
नागपूर,
Naxal-affected areas महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे रोजी गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त म-गर डोह येथील पोलीस पोस्टवर देशभक्तीपूर्ण वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. गोंदिया पोलीस दल आणि नागपूर येथील माऊली सेवा मित्र मंडळ यांच्या संयुक्त पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
 
 
Naxal-affected areas
 
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर उपस्थित पोलीस बांधवांचा माऊली सेवा मित्र मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी मिठाई वाटप करण्यात आले तसेच सर्वांनी एकत्रितपणे भोजनाचा आनंद घेतला. दुर्गम आणि धोकादायक परिसरात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत महाराष्ट्र दिन साजरा करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. Naxal-affected areas या उपक्रमासाठी माऊली सेवा मित्र मंडळाचे निवडक कार्यकर्ते विशेषतः उपस्थित होते. गोंदिया पोलीस दलाने दिलेल्या सहकार्याबद्दल मंडळाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
 
सौजन्य: सुहास खरे, संपर्क मित्र