सरस्वतीवर सरस्वती प्रसन्न! ज्यूनियर कॉलेजचा निकाल ९९ टक्के

    दिनांक :03-May-2026
Total Views |
वर्धा, 
12th-exam-result : वर्धेतील भरत ज्ञान मंडळ्या सरस्वती विद्यामंदिरने विद्यार्थ्यांना शिक्षणासह संस्कृती, संस्कार शिकवण्यावर भर दिला. कुटुंब प्रबोधन हा या वर्षीचा महत्त्वाचा विषय घेऊन काम करणार्‍या या शाळेने बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली. सरस्वती विद्या मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल अ‍ॅण्ड ज्यूनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९९ टके लागला.
 
 
K
 
 
 
कौटुंबीक वातावरणात शिक्षणासह चांगला विद्यार्थी घडावा यासाठी सरस्वती विद्या मंदिरचे संचालक मंडळ कायम प्रयत्नरत असते. सरस्वती विद्यालयातील आयुष ढेंगरे याने ८०.६७ टके गुण घेऊन प्रथम क्रमांक, वेदिका उडान ७९ टके गुण घेऊन द्वितीय आली तर आस्था खोबे आणि सिद्दिकी बाकडे या दोघींनी ७६.५० टके गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला.
 
 
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे, सचिव संजय जलताडे, कोषाध्यक्ष मदन परसोडकर, संचालक अपर्णा हरदास, प्राचार्य ममता विंचूरकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, कौटुंबिक जिव्साळा आणि भारत मातेविषयी प्रेम निर्माण होण्यासाठी आमची संस्था कायम स्वरूपी अग्रेसर असते. विद्यार्थ्यांच्या या यशात प्राचार्य आणि शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे संस्थाध्यक्ष प्रकाश देशपांडे म्हणाले.