समुद्रपूर,
storm-fire-in-samudrapur : तालुक्यात शनिवार २ रोजी रात्री अचानक सुरू झालेल्या वादळाने सर्वत्र हाहाकार उडाला. या वादळामुळे लोखंडी, तावी, वडगाव, महागाव आणि गव्हा या गावांमध्ये गावाशेजारी अचानक आग लागली आणि हवेने आग गावांकडे येण्यास सुरूवात झाली. यावेळी नागरिकांच्या सतर्कतेमुळे पाचही गाव थोडयात बचावले. या आगीत गावाशेजारील शेतातील वैरण, शेती साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच आ. समीर कुणावार यांनी हिंगणघाट, सिंंधी रेल्वे येथील अग्निशमन दलाला घटनास्थळी पाठविले. खैरगाव येथील दसरतसिंग बगेल यांचा गोठा उडून गेला.

तालुयातील अनेक गावांमध्ये शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास जोरदार वादळ-वार्याला सुरूवात झाली. नागरिक या वादळापासून स्वत:ला सावरत असतानाच लोखंडी, तावी, वडगाव, महागाव, गव्हा या गावात जवळपास एकाचवेळी गावाबाहेर आग लागली. आगीची घटना लक्षात येताच गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मिळेल त्या साहित्याने आग आटोयात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. लोखंडी येथे रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोयात आणली. तावी, वडगाव, महागाव आणि गव्हा येथे गावकर्यांच्या सामूहिक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. महागाव (जुने) येथील प्रकाश वाघमारे यांचा गोठा व त्यातील पाईप, कडबा कुटार व स्वयंपाकघर पूर्ण जळाले. वादळामुळे अनेक गावे रात्रभर अंधारात होती. माहिती मिळताच महागाव येथे समुद्रपूरचे ठाणेदार रविंद्र रेवतकर पोलिस कर्मचार्यांसह, लोखंडी, तावी, वडगाव येथे गिरडचे ठाणेदार विकास गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक गोमेद पाटील यांनी पोलिस कर्मचार्यांसह पोहचून आग आटोयात आणण्यासाठी गावकर्यांना सहकार्य केले.