भाडेकरुचा घरमालकाच्या मुलीवर बलात्कार

- मुलगी चार महिन्यांची गर्भवती

    दिनांक :03-May-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर,
tenant-rapes-landlords-daughter : एमआयडीसीतील एका कंपनीत कामावर असलेल्या एका युवकाने वस्तीत एका खाेली भाड्याने घेतली. त्याची वाईट नजर दहावीची विद्यार्थीनी असलेल्या घरमालकाच्या 16 वर्षीय मुलीवर गेली. त्याने तिला जाळ्यात ओढून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर तिच्या आईच्या प्रकार लक्षात आला. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. पाेलिसांनी आराेपीला अटक केली आहे. आराेपी सिम्बा ठाकरे (23) असे आराेपीचे नाव आहे.
 
 
 
ngp
 
 
प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी मूळची मध्य प्रदेशातील बालाघाट येथील असून सध्या ती कुटुंबासह नागपूरच्या एमआयडीसी भागात वास्तव्यास आहे. या प्रकरणातील आराेपी सिम्बा ठाकरे हा मुलीच्या घरी भाडेकरू म्हणून राहत हाेता. या ओळखीचा ायदा घेत त्याने मुलीवर वाईट नजर ठेवली. त्याने हळूहळू त्या मुलीशी ओळखी वाढवली आणि मैत्री केली. गेल्या 5 जानेवारीला मुलगी घरात एकटीच हाेती. हिच संधी साधून सिम्बा तिच्या घरी गेला. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, मुलीने नकार दिला. त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर लग्नाचे खाेटे वचन देऊन त्याने 30 एप्रिलपर्यंत वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकाराबाबत कुणालाही सांगितल्यास पाहून घेण्याची धमकी दिली.
 
पाेट दुखल्यामुळे घटना उघडकीस
 
 
पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाली. मुलगी वारंवार उलट्या करीत असल्यामुळे तसेच पाेट दुखण्याची तक्रार करीत असल्यामुळे मुलीला डाॅक्टरकडे नेले.डाॅक्टरांनी मुलगी चार महिन्यांची गर्भवीत असल्याचे सांगताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीने घाबरलेल्या अवस्थेत आईला घडलेला प्रकार सांगितला. आईने एमआयडीसी पाेलिस ठाणे गाठून मुलीवर ओढवलेला प्रसंग सांगितला. तिच्या जबाबावरून पाेलिसांनी आराेपीविरुद्ध बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पाॅक्साे) गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पाेलिसांनी कारवाई करत आराेपीला अटक केली आहे.