पप्पा, जगणे 'मुश्कील' झाले ..न्यायाधीशाने आयुष्य संपवले

    दिनांक :03-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
The judge ended his life  दिल्लीच्या उच्चभ्रू सफदरजंग भागातील करकरडूमा न्यायालयाचे न्यायाधीश अमन कुमार शर्मा यांनी कथितरित्या गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या हाय-प्रोफाईल प्रकरणामुळे दिल्ली पोलीस आणि न्याय प्रशासनात खळबळ उडाली आहे. घरगुती वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
 

The judge ended his life. 
मृताचे नातेवाईक राजेश शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या आदल्या रात्री अमनने रात्री १० वाजण्याच्या सुमारास आपल्या वडिलांना फोन केला होता. अत्यंत व्यथित आवाजात, आयुष्य खूप कठीण झाले आहे असे सांगून त्याने फोनवर आपली व्यथा व्यक्त केली. हे ऐकून वडील घाबरले आणि त्यांनी लगेचच काय अडचण आहे असे विचारले, पण अमनला ते स्पष्टपणे सांगता आले नाही.
आपल्या मुलाची अवस्था The judge ended his life समजून वडिलांनी त्याच रात्री अलवरहून दिल्लीला निघण्याचा निर्णय घेतला. ते मध्यरात्रीच्या सुमारास दिल्लीतील घरी पोहोचले. तिथे पोहोचल्यावर त्यांना कळले की अमनचे त्याच्या पत्नीसोबत भांडण झाले होते. त्याने वडिलांना सांगितले की, गेल्या दोन महिन्यांपासून त्याचा छळ होत होता. त्याची पत्नी (स्वाती) एक न्यायिक अधिकारी आहे आणि तिची बहीण (निधी मलिक) एक आयएएस अधिकारी असून, सध्या जम्मू येथे कार्यरत आहे. अमनच्या म्हणण्यानुसार, निधी मलिक त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करत होती आणि घरावर नियंत्रण ठेवत होती. याच वादानंतर अमन शर्मा यांनी बाथरुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, अमन कुमार शर्मा हे करकरडूमा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे (डीएलएसए) सचिव म्हणून कार्यरत होते. ते न्यायिक सेवेतील एक जबाबदार अधिकारी होते आणि आपल्या कामाबाबत गंभीर मानले जात होते. ते करकरडूमा न्यायालयात दिवाणी आणि फौजदारी दोन्ही खटले हाताळत होते. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने सहकारी आणि ओळखीच्या लोकांना धक्का बसला आहे.