'गायब होणार' आपली सावली

७ ते २६ मे येणार शून्य सावलीचा अनुभव

    दिनांक :03-May-2026
Total Views |
अमरावती,
Your shadow will disappear सूर्य अगदी ९० अक्षाच्या कोनात डोक्यावर येणार असल्याने ७ मे पासून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या तारखेला दुपारी १२ वाजता सावली गायब होण्याचा अनुभव घेता येणार आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन रेषांच्या मधल्या पट्ट्यातच सूर्यकिरणे क्रमाक्रमाने लंबरूप पडतात. त्यामूळे या भागातूनच वर्षातून दोनदा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. आपली सावली आपल्या पायातच राहील तर सरळ उभ्या वस्तूची सावलीच दिसणार नाही.
 
 
shadow
 
कर्कवृत्तांच्या उत्तरेकडे आणि मकरवृत्ताच्या दक्षिणेकडे सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. त्यामूळे तेथे नेहमी तिरपी सावली पडते. पृथ्वी अक्ष जर सरळ ९० अंक्षात असता तर विषुववृत्तावरच नेहमीसाठी शून्य सावली अनुभवता आली असती. सूर्य दररोज ०.५० अंशच सरकतो म्हणून तो एकाच अंशावर दोन दिवस राहतो. Your shadow will disappear  अक्षांशावर येणाऱ्या सर्व परिसरात एकाच वेळी शून्य सावलीचा अनुभव येतो.
 
 
असा घेता येईल अनुभव
वस्तूसमांतर पृष्ठभागावर एखादा दंडगोल, पेन्सील अथवा तत्सम वस्तू अगदी सरळ उभी ठेवून शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे.
 
 
कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्यात
७ मे कोल्हापूर, मिरज, सांगली, १० मे सातारा, अक्कलकोट, ११ मे वाई, महाबळेश्वर, १२ मे बारामती, बार्शी, १३ मे लातूर, १४ मे अलिबाग, दौंड, पूणे, १५ मे मुंबई, १६ मे नगर, कल्याण, नांदेड, ठाणे, १८ मे पैठण, १९ मे जालना, २० मे संभाजी नगर, नाशिक, २१ मे मनमाड, २२ मे यवतमाळ, २३ मे बुलढाणा, मालेगाव, २४ मे अकोला, २५ मे अमरावती, २६ मे जळगाव, भुसावळ आणि नागपूर येथे शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. Your shadow will disappear या ठिकाणी ठिक दुपारी १२ वाजता सूर्य अगदी डोक्यावर येईल. सर्व खगोलप्रेमींनी आपआपल्या शहरात शून्य सावलीचा अनुभव घ्यावा असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर व प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.