देशसेवेची शपथ घेत काश्मीरचे 538 तरुण सैन्यात दाखल

    दिनांक :30-May-2026
Total Views |
जम्मू,
538 Youths from Kashmir Join the Army जम्मू-काश्मीरमधील 500 हून अधिक तरुणांनी भारतीय सैन्यात दाखल होत देशसेवेची शपथ घेतली आहे. शनिवारी श्रीनगर येथील जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्री (JAKLI) रेजिमेंटल सेंटरमध्ये झालेल्या भव्य पासिंग-आऊट परेडमध्ये एकूण 538 अग्निवीरांनी प्रशिक्षण पूर्ण करून सैन्यात अधिकृत प्रवेश केला.वड्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर या तरुणांनी सैनिकी शिस्त, शौर्य आणि देशसेवेच्या मूल्यांचा स्वीकार करत राष्ट्रासाठी प्रसंगी प्राण देण्याचीही शपथ घेतली. विशेष म्हणजे या तुकडीतील 500 हून अधिक जवान काश्मीर खोऱ्यातील आहेत.
 
 
Kashmir Join
 
या भव्य सोहळ्याला 16 कॉर्प्सचे जीओसी लेफ्टनंट जनरल पी. के. मिश्रा यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.पासिंग-आऊट परेडदरम्यान जवानांनी भारतीय लष्कराच्या परंपरेनुसार शिस्तबद्ध संचलन सादर केले. तिरंग्याच्या साक्षीने पार पडलेला हा सोहळा देशभक्ती आणि लष्करी अभिमानाने भारलेला होता.या क्षणी आपल्या मुलांना सैन्यात दाखल होताना पाहून पालकांच्या डोळ्यांत अभिमान आणि भावनांचा संगम दिसून आला. अनेक कुटुंबीयांसाठी हा क्षण स्वप्नपूर्तीचा ठरला. या परेडला केवळ औपचारिक कार्यक्रम म्हणून नव्हे, तर देशाच्या एकतेचे आणि सुरक्षेचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. अलीकडील सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा अधिकच महत्त्वाचा मानला जात आहे.