क्रौर्यालाही लाजवणारी घटना !

    दिनांक :30-May-2026
Total Views |
वेध
 
विजय कुळकर्णी
8806006149
 
 
cruelty to shame 25 मे सोमवारचा दिवस. एक हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचे वृत्त कानावर पडले. क्रौर्यालाही लाजवेल, अशी ती घटना होती. एका बापाने आपल्या पोटच्या चार मुलांना शेतातील विहिरीत टाकून स्वत: देखील आत्महत्या केल्याची घटना जळगाव जा. तालुक्यातील अजंनगाव भालांजन या आदिवासी गावात घडली. ही बातमी ऐकून मन सुन्न झाले. डोक्यात विचारांचे काहुर माजले. असे काय घडले असेल की, त्या बापाने आपल्या पोटच्या चार मुलांना विहिरीत टाकण्याची दुर्दैवी वेळ त्याच्यावर का आली ? आपल्या मुलांची चूक झाल्यावर थापडही मारत नाही, मात्र या बापाने त्याच्या मुलांना चक्क विहिरीत टाकले. एका झटक्यात संसारवेल सुकली. होत्याच नव्हत झाल. या घटनेतील पिता विजय मुसा कराडिया याने त्याच्या पत्नीला तिच्या माहेर सोडून आल्यावर हे क्रुरकर्म केले. पती-पत्नीत सतत वाद होत होता. घटनेच्या दिवशी देखील त्याच्या पत्नीने माहेरी सोडून देण्याचा हट्ट धरला. तिच्या हट्टापुढे त्याचे काही एक न चालल्याने त्याने तिला माहेरी सोडले. घरी परतल्यावर मुलांना शेतात फिरायला नेतो, असे त्याने त्याच्या वडीलांना सांगितले आणि शेतातील विहिरीत मुलांना टाकून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. पती-पत्नीमधील वाद व त्यातून निर्माण झालेल्या तणावातून ही घटना घडल्याचे पोलिस तपासात प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. हि घटना केवळ एका व्यक्तीच्या मानसिक संतुलन बिघडण्याची नाही.
 

क्रौर्यालाही लाजवणारी घटना ! 
 
 
तर, हा संपूर्ण समाजाच्या ढासळलेल्या मानसिकतेचा नमूना आहे. सामान्यत: नवऱ्याला दारूचे व्यवसन होते. व्यसनातून पत्नीची हत्या केल्याच्या घटना घडतात. पण, या घटनेतील विजय किराडिया हा व्यसनी नव्हता. तो व्यसनमुक्तीचे समाज माध्यमांवरून लोकांना धडे देत होता. आदिवासींमध्ये व्यवसनाधिनता जास्त प्रमाणात असलेली दिसते. पण, विजय त्याला अपवाद होता. आदिवासींनी दारूचे व्यवसन सोडावे, यासाठी तो प्रयत्न करीत होता. त्याच्या मानसिक तणावाचे कारण त्याचा एकलकोंडा व शिघ्रकोपी स्वभाव असावा, असे पोलिस तापासात समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्या जवळच्या नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीत त्याच्या स्वभावाबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून हे कारण या घटनेमागे असू शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे. याचा अर्थ त्याचे गावात जास्त लोकांशी संपर्क नसावा. आजच्या काळात मित्र असतात. पण, ते मोबाईल व समाज माध्यमांवरच. प्रत्यक्ष संपर्क साधून मनमोकळे करण्यासाठी व मनातील दु:ख, चिंता व्यक्त करण्यासाठी चांगले मित्र असणे आवश्यक आहे. पण, आजच्या काळात केवळ व्हॉटस्अ‍ॅप, इंटरनेटवर चॅटींग करणे, रिल पाहुन स्क्रोल करण्यापुरतेच मित्र असतात. त्यामुळे माणूस आपल्या मनातील सुख दु:खाच्या गोष्टी कोणाकडे व्यक्त करू शकत नाही. मनातल्या मनातच त्या साठवून ठेवल्या जात असल्याने अशा घटना घडतात. आज आपल्याकडे भौतिक सुख आहे. इंटरनेट, सोशल मिडियावर भरपूर मित्र आहेत. पण, मनातील दु:ख ज्याकडे व्यक्त करू शकू असा माणूस आपल्याकडे नाही. माणूस आतून एवढा एकटा पडला आहे की, तो आपल्या मुलांचा जिव घेऊन स्वत: देखील आत्महत्या करण्याचा क्रुर निर्णय घेण्यापर्यंत जाऊ शकतो. केवळ संताप अनावर झाल्याने सुंदर सुरू असलेला संसार एका क्षणात मोडून टाकतो. या घटनेत पती -पत्नीच्या वादात त्या चार निष्पाप मुलांचा नाहक बळी देण्याचे काय कारण होतो. त्या लहान जिवांनी तर हे जग पाहिलेही नव्हते. जन्म-मृत्यू म्हणजे काय ? हे देखील त्यांना कळत नव्हते, अशा कोवळ्या वयात त्यांचा असा जिव घेण्याला धक्कादायक हा शब्द देखील अपूरा पडेल. ज्या वयात त्यांच्या हातात खेळणे हवे होते. अभ्यासाची पुस्तके हवी होती. पण, त्यांना मिळाला हकनाक मृत्यू. ही केवळ हत्या आणि आत्महत्या नसून माणुसकीची हत्या म्हणावी लागेल. समाजात अजूनही मानसिक आरोग्याविषयी बोलण्याबाबत कमीपणा वाटतो. पुरूष महिलांप्रमाणे मनातील किंवा घरातील गोष्टी विषयी रडत बसत नाहीत. घरातील दु:ख बाहेर सांगत नाहीत. लोक काय म्हणतील याचा विचार त्यांच्या मनात सतत असतो.cruelty to shame यामुळे मनातल्यामनात कुढत, गुदमरत राहतो. त्यामुळे नैराश्य, मानसिक ताण, कौटुंबिक हिंसा, आर्थिक विवंचना यांचा स्फोट होतो आणि एक दिवस अशी घटना घडते. समाज मात्र, अशा घटनांच्या कारणांची चर्चा करण्यापेक्षा प्रेत मोजत बसतो. आज ग्रामीण भागात शेतकèयांवर पडत असलेला आर्थिक ताण, बेरोजगारी, कुटूंबातील वाढत्या अपेक्षा, प्रत्येकाला मोठे घर, पैसा, प्रतिष्ठा, चैनीचे आयुष्य हवे आहे. मात्र, वास्तव जीवनात हाती अपयश येते. त्यातून न्यूनगंड, चिडचिड, संताप आणि शेवटी हिंसा घडते. मानसिक संतुलन हरवलेला माणूस स्वत:चा आणि दुसèयाचाही जिव घेण्यापर्यंत क्रुर होतो. अशा घटनांतील शोकांतिका म्हणजे समाजातील संवेदनशिलता हरवत चालली आहे. काही लोक मोबाईलवर व्हिडीओ पाहतात, सोशमल मिडीयावर इंग्रजीत आरआयपी लिहितात आणि पुढच्या क्षणी मनोरंजनाच्या रिल्स पाहु लागतात. मृत्यू हा आता दु:खाचा विषय राहिलेला नाही. तो एक कंटेट झाला आहे. प्रश्न केवळ त्या बापाचा नाही. प्रश्न आहे त्या वातावरणाचा, ज्याने त्याला एवढा अंधार दिला. घरात सतत आर्थिक विवंचना असेल, वाद होत असतील, मानसिक आधार नसेल, सतत अपमान होत असेल तर, माणूस आतून खचतो. खचलेला माणूस विचार करीत नाही. तो फक्त प्रतिक्रीया देतो आणि त्या प्रतिक्रीत पाच जिवांचा अंत होतो. तेव्हा, ग्रामीण भागात गरज आहे समुपदेशनाची. मानसिक आधार देण्याची. तेव्हा, सरकार आणि समाजाने अशा मानसिकदृष्ट खचलेल्यांचे समुपदेशन केले पाहिजे, असे सुचवावेसे वाटते.
......