दिग्रसला दोन गटांत हाणामारी

    दिनांक :30-May-2026
Total Views |
6 युवकांवर गंभीर गुन्हे दाखल

दिग्रस, 
Assault case येथील तडका धाब्यावर क्षुल्लक कारणावरुन गुरुवार, 27 मेच्या रात्रीला दोन गटांत चांगलीच हाणामारी झाली. तक्रारीवरुन 6 जणांवर पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. अंबिकानगरातील शिवाजी हेल्थ जिम चालविणाèया सुनील जगदाळेच्या तक्रारीवरून ठाणेदार डॉ. तेजस सारडा यांनी प्रज्योत अरगडे, प्रशांत जोशी, ऋषीकेश शिंदे, नाèया दुधे, शुभम अरगडे व अतुल ढोके या 6 युवकांवर गंभीर गुन्हे दाखल केले असून यांना पोलिस कोठडीत पाठविले.
 
 
mar
 
Assault case सुनील जगदाळे हा आपल्या मित्रांबरोबर तडका धाब्यावर होता. येथे प्रज्योत अरगडे व त्याचे मित्र आले. त्यांच्यातील बोलाचालीतून काही मिनिटांतच वादविवाद सुरू होऊन याचे रूपांतर हाणामारीत झाले. या राड्यात सुनील जगदाळे याला चांगलीच दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, यांच्यात समेट घडवून आणण्यात विलंब झाला आणि पोलिस मात्र अ‍ॅक्शन मोडवर आले. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते मुळात सराईत गुन्हेगार नसून सर्व थोडाफार व्यवसाय करणारे युवक आहेत. यांच्यापैकी एकाची शालांत परीक्षा आहे तर एकाच्या लग्नाची तारीख जवळ आली त्यामुळे यांच्या परिवारात चिंता आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात शनिवार, 30 मे रोजी या 6 आरोपींची आरोग्य तपासणी करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
गुन्हे दाखल करण्यात घाईच
या युवकांच्या हाणामारी प्रकरणात पोलिसांकडून त्वरित अ‍ॅक्शन घेण्यात आल्याने शहरात उलटसुलट चर्चा आहे. मुळात राडा घालणारे युवक हे सारेच एकेकाळचे सवंगडी होते. यांच्यातील वाद मिटवून यापुढे कोणताही वाद निर्माण होणार नाही याचा उपाय शोधून तोडगा काढला जाऊ शकला असता. मात्र गंभीर गुन्हे दाखल झाल्याने दोन गटांत कायमचे वैमनस्य होण्याची शक्यता किंवा तेढ निर्माण झाल्याने पोलिसांकडून घाईच झाली, अशी सर्वसामान्य प्रतिक्रिया आहे.