वॉशिंग्टन,
China nuclear launch pads चीनने अमेरिकेला थेट टक्कर देण्याच्या उद्देशाने शिनजियांग प्रांतातील दुर्गम वाळवंटात अण्वस्त्रांचा तळ उभारण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या उपग्रह छायाचित्रातून या ठिकाणी 80 अणु लाँच पॅड्स उभारल्याचे उघङ झाले आहे.
चीनच्या अण्वस्त्रांवर China nuclear launch pads हल्ला झाल्यास, प्रत्युत्तर देण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होऊ नये, या उद्देशाने हे बांधकाम केले जात आहे.चीनची अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे अमेरिकेतील कोणत्याही शहरापर्यंत पोहोचण्यास आधीच सक्षम आहेत. आता, उपग्रह चित्रांतून चीन लष्कराच्या सर्वात लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचे रक्षण करण्यासाठी दुर्गम भागात प्रक्षेपण पॅड, बंकर आणि संपर्क यंत्रणांचे एक मोठे जाळे उभारत आहे. उपग्रह चित्रांमध्ये 80 पेक्षा जास्त लष्करी पॅड दिसून आले. येथे इलेक्ट्रॉनिक युद्ध यंत्रणा, उपग्रह दळणवळण आणि नियंत्रण कक्षासाठी आवश्यक असणाèया सुविधा देखील उभारल्या जात आहेत. या अवाढव्य बांधकामाची माहिती यापूर्वी कधीही समोर आली नव्हती. चीनच्या जमिनीवर आधारित अणुशक्तीचे रक्षण करण्यासाठी आणि ती कार्यान्वित ठेवण्यासाठी या मजबूत पायाभूत सुविधांचा विस्तार केला जात आहे.
अण्वस्त्रांचे मुख्य केंद्र
अमेरिकेचे माजी लष्करी अधिकारी अलेक्झांडर नील यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की,वाळवंटातील हजारो चौरस किलोमीटर क्षेत्रात उभारण्यात येणाèया लष्करी पायाभूत सुविधांमागे चीन आपल्या धोरणात्मक अण्वस्त्र क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ आणि विविधता आणत असल्याचे दिसते. हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देण्याच्या धोरणावर हे आधारित आहे. गान्सू प्रांतातील सायलो क्षेत्रे त्यांच्या अण्वस्त्रांचे मुख्य केंद्र असल्याचे दिसून येत आहे.