जिल्हाधिकारी वान्मथी सी. गावात मुक्कामी; झाली वाचनालयाची मागणी!

    दिनांक :30-May-2026
Total Views |
ग्रामस्थांशी साधला संवाद
 
वर्धा, 
ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी आणि प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी Collector Vanmathi C. जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी कारंजा (घा.) तालुयातील गारपीट येथे २९ रोजी रात्री मुक्काम केला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी तरुणांनी गावात वाचनालयाची मागणी केली. ही मागणी केल्याचा मनस्वी आनंद झाला असल्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अतिरित मु‘य कार्यकारी अधिकारी वैशाली रसाळ, तहसिलदार अनिल निनावे, अप्पर तहसिलदार नेहा मावस्कर, गट विकास अधिकारी अरुण इंगळे, विस्तार अधिकारी वानखेडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या सं‘येने उपस्थित होते.
 
 
Vanmathi
 
Collector Vanmathi C. सायंकाळी ७.३० वाजता आयोजित या ग्रामसंवाद कार्यक‘मात ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी, रस्ते, वीज पुरवठा, स्वच्छता यांसह विविध मूलभूत सुविधांविषयीच्या मागण्या व समस्या जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्यासमोर मांडल्या. गावात सद्यस्थितीत गढूळ पाणीपुरवठा येत असून, कायमस्वरूपी शुद्ध पाण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी ग‘ामस्थांनी केली. जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी पाणीपुरवठा विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
 
 
गावातील रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्याबाबत आणि तेंदूपत्ता बोनस अद्याप मिळाला नसल्याची तक्रार गावकर्‍यांनी केली. यावर तात्काळ दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी विद्युत विभागाला बंद असलेले पथदिवे त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या हस्ते गावातील घरकुल योजनेचे लाभार्थी राठोड यांना त्यांच्या नवीन घराची चावी सुपूर्द करून गृहप्रवेश केला.
 
 
जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी गावातील तरुण पिढीच्या बेरोजगारीचा प्रश्न आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. गावातील बेरोजगार तरुणांना त्यांच्या कौशल्यानुसार आवश्यक ते प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले. तसेच, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, रोजगार निर्मिती, स्वच्छता आणि ग्रामविकासाच्या उपक‘मांमध्ये गावकर्‍यांनी सकि‘य सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.