नोएडात CUET परीक्षा उशिरा; विद्यार्थ्यांचा एनटीएवर हल्लाबोल

    दिनांक :30-May-2026
Total Views |
नोएडा,
CUET Exam Delayed in Noida नीट परीक्षेतील वाद अजून शांत न होता, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावेळी CUET-UG परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणावर गोंधळ आणि तांत्रिक अडचणी समोर आल्या असून अनेक परीक्षा केंद्रांवर वेळापत्रक कोलमडल्याचे चित्र दिसून आले.
 
CUET Exam Delayed in Noida
 
नोएडामधील परीक्षा केंद्रांवर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पहिली शिफ्ट अचानक पुढे ढकलण्यात आली, तर दुपारची दुसरी शिफ्टही नियोजित वेळेपेक्षा सुमारे एक तास उशिरा सुरू झाली. CUET Exam Delayed in Noida सेक्टर ६४ मधील आदर्श परीक्षा केंद्रावर या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी एनटीएविरोधात घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली. परीक्षा वेळेबाबत स्पष्ट माहिती न मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला.
 
 
घटनेनंतर एनटीएने स्पष्टीकरण देत सांगितले की, काही केंद्रांवर तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने विलंब झाला होता, मात्र ती समस्या आता दूर करण्यात आली आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये यासाठी अतिरिक्त वेळ देऊन परीक्षा घेतली जात असल्याचेही एजन्सीने स्पष्ट केले. CUET Exam Delayed in Noida तसेच परीक्षेच्या वेळेत बदल करून उमेदवारांना सुधारित वेळापत्रक कळवण्यात आल्याचेही एनटीएने सांगितले. एनटीएने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर स्पष्टीकरण देताना टीसीएसच्या माध्यमातून काही केंद्रांवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना दिलगिरी व्यक्त केली. परीक्षार्थींना पुरेसा वेळ दिला जात असल्याचेही एजन्सीने सांगितले.
 
दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या असून परीक्षा केंद्रांवर योग्य नियोजन आणि माहितीचा अभाव असल्याचा आरोप केला जात आहे. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत असून एनटीएच्या परीक्षा व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. CUET Exam Delayed in Noida CUET-UG परीक्षा २०२२ पासून सुरू झाली असून देशभरातील केंद्रीय, राज्य आणि खासगी विद्यापीठांमध्ये पदवी प्रवेशासाठी ही महत्त्वाची परीक्षा मानली जाते. मात्र सुरुवातीपासूनच या परीक्षेला वेळापत्रक बदल, तांत्रिक अडचणी आणि व्यवस्थापनातील त्रुटींचा सामना करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने अस्वस्थता निर्माण होत आहे.