दत्तक वडद गावाने केला विकासाचा संकल्प

    दिनांक :30-May-2026
Total Views |
आमदार पुत्र गौरव बकाने यांचा पुढाकार
 
देवळी, 
dattak gram abhiyan देवळी मतदार संघातील वडद येथे आमदार पुत्र गौरव बकाने यांच्या पुढाकाराने २५ रोजी एक पाऊल विकासाकडे या संकल्पनेतून आयोजित दत्तक ग्राम अभियानाला सुरुवात झाली. युवा उद्योजक, लेखक तथा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नीव प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संस्थापक गौरेश बकाने यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक‘माने गावाच्या विकासाला नवी दिशा देण्याचा निर्धार व्यत केला. वाढदिवसानिमित्त कोणताही व्यक्तिगत सत्कार, हार-तुरे किंवा दिखाऊ कार्यक‘म न करता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक संकल्प करण्याचा अभिनव उपक‘म गौरेश बकाने यांनी राबविला. त्यांनी वडद हे गाव महाराष्ट्रातील आदर्श, स्वच्छ, सक्षम आणि प्रगत गाव बनविण्याचा संकल्प व्यत केला. गौरेश बकाने यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ग‘ामीण विकासासाठी हा उपक‘म हाती घेतला आहे. अभियानांतर्गत ग्राम स्वच्छता अभियान राबवून गावातील रस्ते, सार्वजनिक परिसर आणि विविध भागांची स्वच्छता करण्यात आली. युवक, महिला आणि ग्रामस्थांनी स्वतः सहभागी होत स्वच्छ व सुंदर वडदचा संदेश दिला.
 
 
dattak
 
यावेळी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर रतदान शिबिरात युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महिला समूह बैठकीत महिला सक्षमीकरण, बचत गट, रोजगार निर्मिती आणि आर्थिक साक्षरतेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. युवकांसाठी आयोजित विशेष मार्गदर्शन सत्रात करिअर संधी, डिजिटल प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा तयारी, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती याविषयी माहिती देण्यात आली. तसेच शेतकर्‍यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान, सिंचन व्यवस्थापन आणि विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
 
 
dattak gram abhiyan  ग्रामसभा व समस्या नोंदणी कार्यक‘मात ग्रामस्थांनी गावातील विविध प्रश्न मांडले. टप्प्याटप्प्याने त्यांचे निराकरण करण्याचा निर्धार व्यत केला. या अभियानाला आ. राजेश बकाने, देवळी नपचे उपाध्यक्ष राहुल चोपडा, किशोर गव्हाळकर, विनोद माहुरे, चंद्रशेखर बेल्हे आदींसह वडद येथील ग‘ामस्थ उपस्थित होते. यावेळी गौरेश बकाने यांनी गावाच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यत करत, गाव बदललं तर भविष्य बदलतं, असा विश्वास व्यत केला.