२ लाख ८५ हजारांचे डिझेल-पेट्रोल जप्त

    दिनांक :30-May-2026
Total Views |
वर्धा, 
Diesel and Petrol Seized सावंगी (मेघे) पोलिसांनी दहेगाव (स्टेशन) शिवारात छापा टाकून २ लाख ८५ हजार ७५९ रुपयांचे २७३० लिटर डिझेल-पेट्रोल जप्त केले. ही कारवाई शनिवार ३० रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आली. दहेगाव (स्टेशन) शिवारात काही इसम संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती सावंगी पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिस पथक तत्काळ घटनास्थळी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासह गेले.
 
 
Diesel and Petrol Seized
 
Diesel and Petrol Seized  त्यावेळी घटनास्थळावर ५४ प्लॅस्टिक कॅनमध्ये १६२० लिटर डिझेल आणि ३७ प्लॅस्टिक कॅनमध्ये अंदाजे १११० लिटर पेट्रोल, असे २७३० लिटर डिझेल-पेट्रोल आढळून आले. पोलिसांना बघताच संशयित इसम पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ अग‘वाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक पंकज वाघोडे, पोलिस कर्मचारी सतीश दुधाने, शरद मून, नितीन भगत, संजय पंचभाई, आकाश गोरे, सुमित राठोड, अंजली गडेकर यांनी केली आहे.