मुख्यमंत्री विजयच्या मुलाचे दिग्दर्शकीय पदार्पण

    दिनांक :30-May-2026
Total Views |
हैद्राबाद,
Directed by Chief Minister Vijay's son तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि तमिळगा वेत्री कळघमचे प्रमुख आणि मुख्यमंत्री विजय यांचा मुलगा जेसन संजय आता दिग्दर्शक म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा पहिला चित्रपट ‘सिग्मा’ ३१ जुलै रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘सिग्मा’ची निर्मिती लायका प्रॉडक्शन्सने यांनी केली असून सध्या चित्रपट पोस्ट-प्रॉडक्शनच्या अंतिम टप्प्यात आहे. लवकरच हा चित्रपट सेन्सॉर मंडळाकडे पाठवला जाणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा स्वतः जेसन संजयने लिहिली असून दिग्दर्शनाची धुराही त्यानेच सांभाळली आहे.
 
 
ऐडवे
 
चित्रपटात संदीप किशन प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत संतोष, शिव पंडित, मेघालक्ष्मी, शीला राजकुमार, कमलेश आणि किरण कोंडा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा अॅक्शन, विनोद, खजिन्याचा शोध आणि चोरी याभोवती फिरणारी असल्याचे सांगितले जात आहे. ‘सिग्मा’चा टीझर डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. टीझरमध्ये संदीप किशन एका रहस्यमय मोहिमेवर निघालेल्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसला होता. दरम्यान, विजय यांच्या आगामी ‘जना नायकन’ चित्रपटाचीही चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.