आयपीएल नव्हे आता शेतकऱ्यांचा ‘एफजीएल’

    दिनांक :30-May-2026
Total Views |
शेतकरी गटांसाठी ‘फार्मर ग्रुप लीग’ स्पर्धा

यवतमाळ, 
'Farmer Group League' Competition जिल्हा प्रशासन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाèया शेतकरी गटांसाठी जिल्ह्यात आगळीवेगळी ‘फार्मर ग्रुप लीग’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 10 जून ते 10 ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. स्पर्धेत सहभागी शेतकरी गटांच्या सदस्यांना करावयाच्या कामांचे चार स्तर निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक स्तरात चार ते पाच लघु कृती अथवा अ‍ॅक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. त्या पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना गुणांकन दिले जाईल.
 
 
Farmer Group
 
स्पर्धेदरम्यान करण्यात आलेल्या सर्व कृतींचे व्हिडिओ चित्रण, छायाचित्रे तसेच नोंदवही ठेवणे आवश्यक राहणार आहे. चारही स्तर यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विजेत्या स्पर्धकांचा 15 ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच विजेत्यांना आंतरराज्य, राज्य व जिल्हा अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्याची संधीही मिळणार आहे. या ‘फार्मर ग्रुप लिग’ स्पर्धेत चार टप्पे किंवा स्तरानुसार गुणांकन केले जाणार आहे. त्यामध्ये मृदा व बीज व्यवस्थापन, पीक पद्धती व शेती तंत्रज्ञान, जैविक निविष्ठा व कीड रोग व्यवस्थापन, क्षमता बांधणी, प्रसार व तंत्रज्ञान वापर या चार टप्प्यांनुसार गुणांकन दिले केले जाणार आहे.
 
 
त्यानुसार पहिल्या टप्प्यात मृदा व बीज व्यवस्थापन अंतर्गत माती नमुने तपासणी, बियाणे उगवण चाचणी, बीज प्रक्रिया, शेणखत, गांडूळखत, हिरवळीच्या खतासाठी (प्रती शेतकरी) प्रत्येकी एक गुण मिळणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात पीक पद्धती व शेती तंत्रज्ञान अंतर्गत बीबीएफ व टोकन यंत्र वापर, सापळा पिके, आंतरपिकांसाठी (प्रती एकर) प्रत्येकी एक गुण दिले जातील. तिसऱ्या टप्प्यात भाग एकमध्ये जैविक निविष्ठा निर्मिती अंतर्गत वनस्पतीजन्य कीटकनाशके, जीवामृत, घनजीवामृत निर्मितीसाठी एक गुण, तर बायोडायनॅमिक कंपोस्ट निर्मिती करणाèयांना दोन गुण दिले जातील. तसेच भाग दोनमध्ये प्रत्यक्ष कीड रोग नियंत्रण अंतर्गत हुमा अळी नियंत्रण मोहीम, ट्रायकोकार्ड व फेरोमन ट्रॅप्स, चिकट सापळे, पक्षी थांबे या घटकासाठी प्रत्येकी एक गुण मिळणार आहे.
 
 
'Farmer Group League' Competition  चौथा टप्पा महत्त्वाचा असून त्यामध्ये प्रसार क्षमता बांधणी व नेतृत्व अंतर्गत शेतीशाळा सहभागासाठी एक गुण, जलतारा शेत शोषखड्डा निर्मितीसाठी दोन गुण तर शिवारफेरी, कार्यशाळा, गावाबाहेर मार्गदर्शन करणाऱ्यांना प्रती कार्यक्रम 5 गुण मिळणार आहे. या फार्मर ग्रुप लिग स्पर्धेतील चौथ्या टप्प्यात महाविस्तार अ‍ॅपचा वापर करणाऱ्या तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान व यशोगाथांचा प्रसार करणाèया शेतकरी गटांना 10 गुणांचा मेगा बोनस मिळणार आहे. या स्पर्धेसाठी 10 जूनपर्यंत गुगल फॉर्मद्वारे व गावाचे सहायक कृषी अधिकारी यांच्याकडे नोंदणी करता येणार आहे. या स्पर्धेतील निकषानुसार प्रत्येक गावातून किमान एक शेतकरी गट अनिवार्य आहे. एका गटामध्ये किमान 10 ते 20 सदस्य असावेत.

शेतकरी गटांनी सहभाग घ्यावा
जिल्ह्यातील शेतकरी प्रगतिशील असून, शेतीत नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेती पद्धतीत सुधारणा करत आहेत. जिल्ह्यात प्रथमच ‘यवतमाळ फार्मर ग्रुप लीग’ राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शेतकरी गट म्हणून आधुनिक तंत्रज्ञान, पिकांचे योग्य व कमीत कमी खर्चात व्यवस्थापन आणि समूह शेती यासाठी स्पर्धा घेऊन, अशा शेतकऱ्यांचा व गटांचा योग्य सन्मान करण्यात येईल. जास्तीत जास्त शेतकरी गटांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.