गोंदियाच्या फुलचूर येथील बारदाना कंपनीला भीषण आग

    दिनांक :30-May-2026
Total Views |
- कंपनी मालकाचे कोटींचे नुकसान : सुदैवाने जीवितहानी नाही

गोंदिया, 
Fire at Phulchur Company जवळील फुलचूर येथील एका बारदाना (पोती) बनवणार्‍या कंपनीला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी 29 मे रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवीतहाणी झाली नसली तरी कंपनीतील संपूर्ण माल जळून कंपनी मालकाचे जवळपास दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमीक अंदाज आहे.
 
 
aag
 
Fire at Phulchur Company  मिळालेल्या माहितीनुसार फुलचूर येथील आंबाटोली परिसरात गोंदिया येथील सुनील अग्रवाल यांची बारदाना तयार करण्याची आणि साठवणुकीची कंपनी आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे सर्व कामगारांना सुट्टी झाल्यानंतर रात्री 10 वाजताच्या सुमारास अचानक कंपनीच्या आवारातून धूर निघताना दिसला. बारदाना अत्यंत ज्वलनशील असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण कंपनीला आपल्या विळख्यात घेतले. आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि कंपनी प्रशासनाने तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाने घटनास्थळ गाठून पाण्याचा मारा केला मात्र, तोपर्यंत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली होती. आगीची भिषणता एवढी होती की, अग्निशामक दलाकडून रात्रीपासून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु असताना शनिवार 30 मे रोजीच्या सायंकाळपर्यत कंपनीतून धूर निघत असल्याचे दिसून आले. सदर आगीत अग्रवाल यांचे सुमारे दोन कोटी रुपयांपर्यंतचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत असून घटनेची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे.