गडकऱ्यांची नाटके ही मराठी साहित्याची लेणी

प्रकाश एदलाबादकर यांचे प्रतिपादन

    दिनांक :30-May-2026
Total Views |
‘संगीत एकच प्याला’च्या मुहूर्तप्रसंगी गडकरींच्या साहित्यवैभवाचा गाैरव
नागपूर,
Prakash Edlabadkar नाटककार राम गणेश गडकरी म्हणजे सरस्वतीच्या गळ्यातील कंठमणी आहेत. नाटक, कविता आणि विनाेदी लेखन या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी अभूतपूर्व कार्य केले. त्यांच्या प्रतिभेची उंची आणि कल्पनाशक्तीचे वैभव पाहता गडकऱ्यांची नाटके ही मराठी साहित्याची लेणीच आहेत, असे गाैरवाेद्गार ज्येष्ठ समीक्षक, पत्रकार आणि वक्ते प्रकाश एदलाबादकर यांनी काढले.
 
 
Prakash Edlabadkar
 
 
भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्या 141 व्या जयंतीनिमित्त 26 मे 2026 राेजी राजेंद्र हायस्कूल, येथे ‘संगीत एकच प्याला’ या अजरामर नाट्यकृतीच्या सादरीकरणाचा मुहूर्त एदलाबादकर यांच्या हस्ते संपन्न झाला. ‘संगीत मत्स्यगंधा’च्या यशानंतर नागपुरकरांसाठी ‘संगीत एकच प्याला’चे सादरीकरण रंगभूमीवरील महत्त्वाची पर्वणी ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नारायण जाेशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात दिग्दर्शक प्रभाकर ठेंगडी आणि ज्येष्ठ अभिनेत्री शाेभना माेहरील व्यासपीठावर उपस्थित हाेत्या. आपल्या भाषणात एदलाबादकर यांनी ‘एकच प्याला’ या नाटकाच्या आशयवैभवावर भाष्य करताना सांगितले की, दारूच्या दुष्परिणामांवर आधारित हे नाटक मराठी रंगभूमीवरील सर्वाेत्तम शाेकांतिकांपैकी एक आहे. सामाजिक आशय, प्रभावी व्यक्तिरेखा आणि भावस्पर्शी संवाद यांमुळे हे नाटक आजही तितकेच समकालीन वाटते. प्रभाकर ठेंगडी हे शिवधनुष्य समर्थपणे पेलतील, याची मला खात्री आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी मराठी संगीत रंगभूमीच्या परंपरेचा आणि तिच्या वैभवशाली इतिहासाचाही थाेडक्यात आढावा घेतला. प्रास्ताविकात दिग्दर्शक प्रभाकर ठेंगडी यांनी सांगितले की, ‘एकच प्याला’ हे मूळ पाच अंकी नाटक दाेन अंकांत संपादित करून आधुनिक तंत्रसहाय्याच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नटराज पूजन आणि गडकऱ्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.Prakash Edlabadkar त्यानंतर नाटकातील दाेन प्रवेशांचे साभिनय नाट्यवाचन कलाकारांनी सादर केले. तसेच ‘परम गहन ईशकाम’ आणि ‘कशी या त्यज्यू पदाला’ ही नाट्यपदेही सादर करण्यात आली.
दि मध्य प्रदेश एज्युकेशन साेसायटी, नागपूरची निर्मिती असलेल्या या नाटकाचे निर्माते माेहन नाहातकर आहेत. नाटकात मनीष माेहरील, यामिनी पायघन, गुणवंत घटवाई, मुकुंद वसुले, यशवंत चाेपडे, राेहिणी माेहरील, विनाेद तुंबडे, नारायण जाेशी, शेखर मंगळमूर्ती, सचिन कानडे आणि अभिषेक पाठक हे कलाकार भूमिका साकारणार असून संगीत संयाेजन भास्कर पिंपळे आणि हर्षद पायघन यांचे असणार आहे.